नाशिक

बच्चूू कडूंच्या उपोषणाला छावा क्रांतिवीर सेनेचा पाठिंबा!

करण गायकर यांचा इशारा ः ‘शेतकर्‍यांचे प्रश्न दुर्लक्षित झाल्यास 36 जिल्ह्यांत रास्ता रोको’

नाशिक : प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी मागील सहा दिवसांपासून उपोषण करत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला आता छावा क्रांतिवीर सेनेने ठाम पाठिंबा जाहीर करत, या संघर्षात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अमरावतीतील उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फक्त पाठिंबाच नव्हे, तर सेनेच्या वतीने उपोषणात सक्रिय सहभागी होण्याची घोषणा करत राज्य सरकारला तीव्र इशारा दिला. आम्ही केवळ सहवेदना व्यक्त करण्यासाठी आलो नाही, तर तुमच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहोत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी ठणकावले.
करण गायकर यांनी यावेळी राज्य सरकारवर कठोर शब्दांत निशाणा साधत म्हटले की, जर सरकारने या उपोषणाची तत्काळ दखल घेतली नाही तर आम्ही एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार माफ होऊ शकतात, तर शेतकर्‍यांचे काही लाखांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही? यावेळी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या माणिकराव कोकाटेंवरही त्यांनी रोष व्यक्त करत, ‘डोके ठिकाणावर ठेवा, नाहीतर तुमचे डोके सडकून ठेप्यावर आणू’ असा इशारा दिला.
शेतकरी पुत्र म्हणून तुमच्याकडे राज्यातील शेतकरी आशेने बघतो आहे, परंतु तुम्ही अजित पवारांच्या नादाला लागून बेताल वक्तव्य करणे थांबवा, अन्यथा शेतकर्‍यांना तुमचा बंदोबस्त करावा लागेल. आंदोलन ही सामाजिक बांधिलकी आहे आणि छावा क्रांतिवीर सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभा राहील. हा लढा केवळ बच्चू कडू यांचा नसून, संपूर्ण शेतकरी समाजाचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
छावा क्रांतिवीर सेनेच्या या ठाम आणि सक्रिय पाठिंब्यामुळे बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन अधिकच बळकट झाले आहे. आता राज्य सरकार यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे; अन्यथा राज्यभर मोठा संघर्ष सर्व शेतकरी मिळवून उभा करतील. यावेळी हा पाठिंबा देण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी मोरे, सुभाष गायकर, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोखे, वैभव दळवी, संगीताताई सूर्यवंशी, सविताताई वाघ, गोरख संत, भारत पिंगळे, राम पाटील गाडेकर, अविनाश तांदळे, सोपान लांडगे, तुकाराम पाटील भुतेकर, रमेश पाटील तुपे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

 

Gavkari Admin

Recent Posts

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

5 hours ago

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही… कुठे घडला नेमका हा प्रकार?

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…

5 hours ago

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

1 day ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

1 day ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

1 day ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

1 day ago