ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्या अडचणीत वाढ
नाशिक :प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, दहशतवादी सलीम कुता याच्या पार्टीत सहभागी झाल्याबद्दल अखेर गुन्हा शाखेने बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका पार्टीत बडगुजर हे सहभागी झाले होते, याबाबत चा व्हीडिओ व्हायरल झाला होता, विधिमंडळ अधिवेशनात नितेश राणे यांनी हे प्रकरण लावून धरलं होते, त्यानंतर चौकशी सुरू केली होती, या प्रकरणी16, ते 17 जणांची चौकशी झाली होती, अखेर काल याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नुकतीच बडगुजर यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे,
दरम्यान, सरकारकडून दबाव तंत्र अवलंबण्यात येत आहे, विरोधकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे, असा आरोप बडगुजर यांनी केला आहे,