मनमाड : आमिन शेख
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्यां व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही त्यामुळे आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असुन आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नवीन संकट येऊन ठेपले आहे.
कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यातशुल्क यासह इतर मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी मागे काही दिवसांपासून आंदोलन केले व बाजार समित्याचा लाक्षणिक बंद देखील पुकारला होता त्यावेळी केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री नामदार डॉ भारती पवार यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र त्या दिवसापासून मागण्या प्रलंबितच होत्या यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत देखील तोडगा न निघाल्याने आज (बुधवार) पासुन जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 बाजार समित्या तसेच उपबाजार समित्या बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असुन आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात कांद्यासह शेतमालाचा कमी झालेला भाव यातुन कसा मार्ग काढावा तर 2 पैसे मिळतील या आशेने साठवून ठेवलेला कांदा विकुन 2 पैसे मिळतील मात्र आजपासून बाजार समिती बंद असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आंदोलन…!
केंद्र सरकारने 40 टक्के पर्यंत निर्यातशुल्क लावले आहे यासह नाफेडचा कांदा देखील खरेदी करुन तो बाजारात आणला आहे यामुळे इथे महाग कांदा घेऊन तो कांदा परराज्यात कमी पैशात विकावा लागतो यामुळे व्यापारी वर्गाचे देखील नुकसान होत आहे यामुळे आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत बंद पुकारला आहे असे मत कांदा व्यापारी संघटनेने जाहीर केले आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…