मालेगावात फुगे भरण्याच्या सिलेंडरचा स्फोट; सहा जण जखमी
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच सोमवारी सकाळी फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दुर्घटना घडली. या स्फोटात एकूण सहा जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. कवायत मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नागरिक व विद्यार्थी घरी परतत असताना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कॉलेज स्टॉप परिसरात रस्त्याच्या कडेला फुगे विकणाऱ्या विक्रेत्याच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्याने जाणारे विद्यार्थी व नागरिक या घटनेत जखमी झाले. नागरिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात विनोद थोरात (४५), प्रमिला यादव (४३), अतुल शेवाळे (४३), उज्वला महाजन (३५) व मोहित जाधव (१५) यांचा समावेश आहे. मोहित जाधव हा काकाणी शाळेतील नववीतील विद्यार्थी आहे.
डोळ्याला जखम झालेल्या एका जखमीचे नाव समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फुगे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…