महाराष्ट्र

मनमाडला बारामती-पाचोरा बसचा अपघात

मनमाड : प्रतिनिधी
मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात बारामती- पाचोरा बसला अपघात झाला. ओव्हरटेक करताना ही बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरली. मात्र, सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्या प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसवून पुढील प्रवासाला रवाना करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीवरून पाचोर्‍याला जाणारी बस (एमएच 14-एमएच 8593) ही बस मनमाडनजीक अनकवाडे शिवारात जात असताना ओव्हरटेक करत असतानाच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यात ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उतरली. यामुळे बसमध्ये सर्व प्रवासी अडकले. हा अपघात गावासमोर घडला. यामुळे स्थानिक भीमा शिंदे व इतरांंनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना इमर्जन्सी एक्सिट (आपत्कालीन दरवाजातून) बाहेर काढले व सर्वांना सुखरूप दुसर्‍या बसमध्ये बसवून पुढील प्रवासाला रवाना केले.

इंदूर- पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे

मनमाड शहरातून इंदूर- पुणे महामार्ग जातो. हा रस्ता एमएमकेआयपीएलकडे आहे. या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती या टोल कंपनीकडे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. याशिवाय या महामार्गावर अनेक ठिकाणी साइडपट्ट्या नाहीत. त्यामुळेदेखील अनेक अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीने या महामार्गावर असलेले खड्डे बुजवून साइडपट्ट्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago