नाशिक : यश भारती
नवरात्रोत्सव अवघा दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरगुती घटस्थापनेच्या साहित्य खरेदीबरोबरच मंडळांमार्फत स्थापना करण्यात येणार्या देवीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विवधि साहित्याची खरेदी सुरू
झाली आहे.
द्वारका परिसरातील काठे गल्ली सिग्नलजवळ विविध प्रकारच्या देवीच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. स्थानिक मूर्तिकारांनी उभारलेल्या या स्टॉल्सवर पारंपरिक व आधुनिक अशा विविध प्रकारच्या आकर्षक व रंगीबेरंगी मूर्तींचा मोठा संग्रह ठेवण्यात आला आहे. घरगुती पूजेच्या मूर्तींपासून ते मंडळासाठी लागणार्या मोठ्या मूर्तींपर्यंत भाविकांना भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मूर्तींच्या आकारमानानुसार किमती सुमारे 2,800 रुपयांपासून 25 हजारांपर्यंत आहेत. यावर्षी पर्यावरणपूरक मूर्तींनाही मागणी दिसून येत आहे. दुसरीकडे, विक्रेत्यांनी सांगितले की, यंदा मूर्तींची मागणी लवकर सुरू झाली असल्यामुळे पारंपरिक मूर्तींबरोबरच आधुनिक डिझाइनच्या मूर्तींचीही मागणी होत आहे.
मूर्तीची विक्री अपेक्षेइतकी होईल असा आम्हाला विश्वास आहे. मूर्तींसोबतच पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि फुलांच्या माळांची विक्रीही सुरू झाल्याने परिसरात गजबजलेले वातावरण पाहायला
मिळत आहे.
नवरात्रातील घटस्थापना जवळ आल्यामुळे भाविकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरू आहे. काठे गल्ली सिग्नलजवळील हा भाग श्रद्धा आणि उत्साहाचा संगम ठरत आहे. यावर्षी ग्राहकांची मागणी चांगली असल्यामुळे जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून केली जात आहे.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…