महाराष्ट्र

सावधान जर अनोळखी चार्जर हब किंवा यूएसबी वापराल तर

सावधान जर दुसऱ्याचा चार्जर वापराल तर
हॅकिंग ची पुढची पायरी

नासिक प्रतिनिधी

सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरणे त्याचा दुरुपयोग करणे अकाउंट मधील पैसे गायब होणे , ब्लॅकमेलिंग असे अनेक प्रकार घडत आहेत आता या हॅकर्सने पुढची पायरी गाठली असून इतरांचे मोबाईल हॅक करून गंडवले जात आहे

मोबाईलची बॅटरी दिवसभर पुरावी यासाठी बॅटरी लाइफ चांगले असलेले मोबाईल आपण निवडतो परंतु मोबाईलवर काम जास्त असल्यास काही मोबाईल दिवसभरात एकदा किंवा दोनदा चार्जिंग करावे लागतात कधी सोबत चार्जर आणायला विसरलो किंवा दुसऱ्याचे चार्जर वापरले यूएसबी कोड वापरली जाते ही गरज नेहमीच आपल्याला किंवा आपल्या सोबतच्या लोकांना पडत असते हॅकरने या गोष्टी लक्षात घेऊन हॅकिंग चा नवा फंडा पुढची पायरी घातली आहे चार्जर किंवा यूएसबी कार्ड याद्वारे त्यामध्ये बसवलेली चीप आपल्या मोबाईलचा सर्व डेटा कॉपी करून घेतला जातो अशी ट्रिक वापरून गंडवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत
यासाठी चार्जर किंवा यूएसबी कोड वापरून मोबाईलचा संपूर्ण डेटा हॅक करण्याची पद्धत शोधून काढली आहे ते कसे काय हे तुम्हाला पुढील उदाहरणावरून लक्षात येईल

एका मोठ्या कंपनीचा CEO च्या
त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता , कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत….

मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा फक्त एक क्लू मला मिळाला
त्याच्या ऑफिसमधला CCTV फुटेजवरून तिथं क्लू मिळाला

तर त्या CEO चा मोबाईलचा चार्जर हा बदलला गेला ऑफिसमधेच आणी त्याच्या ठिकाणी दुसरा USB चार्जर ठेऊन त्याचा सगळा डेटा हा कॉपी केला गेला त्याची अख्खी मोबाईल बँकिंग हॅक केली गेली आणी अकाउंट मधुन पैसे काढले गेले तर ह्या modus oprendy मध्ये आधी चार्जर रिप्लेस केला जातो व त्या चार्जर मध्ये एक आधीच एक मायक्रो चिप बसवलेली असते त्यात सगळा डेटा कॉपी केला जातो आणी हॅकिंग होते आणी हा अतिशय न समजून येणारा प्रकार आहे आणी माझ्या नॉलेज मध्ये हा पहिलाच प्रकार आहे हॅकिंग मधला

त्यामुळे इथून पुढे चार्जर्स आणी यूएसबी कॉड वर विशेष लक्ष ठेवा कोणाचे ही वापरू नका किंवा आपला मोबाईल अनोळखी ठिकाणी चार्जिंग ला लावू नका

आपल्या मोबाईल सोबत आलेला ओरिजिनल चार्जर आणि केबलच वापरावी. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही केबल ला अथवा चार्जर ला आपला मोबाईल कनेक्ट करू नये. त्यातून आपल्या मोबाईलमधला डेटा चोरी होण्याचा धोका असतो. या डेटा मध्ये आपले खाजगी फोटो,व्हिडीओ, महत्वाची कागदपत्रे, तसेच बँकिंग माहिती सुद्धा असते, जी चोरली जाऊ शकते आणि त्याचा गैरवापर होतो.

– ओंकार गंधे (सायबर तज्ज्ञ)

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

6 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

6 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

6 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

6 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago