नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील एकलहरा मार्गावर असलेल्या अस्वले मळ्यात रविवार दि. 28 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
एकलहरे रोड ते पॉलिटेक्निक कॉलेज रोड मधील अस्वले मळ्यात मारुती मंदिराजवळ वृंदावन कॉलनीत राहणारे नितीन चंद्रभान पवार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करीत कपाट तोडून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. सासरे आजारी असल्याने शनिवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी नितीन पत्नी कांचन आणि मुलांसह संगमनेर येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. नितीन चंद्रभान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करीत आहेत.
Bears loot around 15 tolas of gold while breaking into a house in Aswale Malwa