मिश्र त्वचेसाठी रुटीन
सकाळची काळजी : मिश्र त्वचेमध्ये टी झोन तेलकट आणि बाकी भाग कोरडा असतो. त्यामुळे सकाळी बालन्स्ड फेसवॉश वापरावा. नंतर गुलाबजल + ग्रीन टीयुक्त टोनर वापरला तरी चालतो. टी झोनसाठी जेल बेस्ड आणि बाकी भागासाठी हलकं क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरावा. सनस्क्रीन ही नॉन-कॉमेडोजेनिक असावी.
रात्री दोन्ही भागांची वेगवेगळी काळजी घ्या. नायसिनामाइड आणि हायलुरॉनिक यांचे कॉम्बो सिरम वापरू शकता. टी-झोनसाठी लाइट जेल आणि गालांसाठी हायड्रेटिंग क्रीम वापरा. हे त्वचेला संतुलन राखण्यास मदत करते.
संवेदनशील त्वचेसाठी रुटीन
संवेदनशील त्वचा पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन, रेडनेस आणि अ‍ॅलर्जीला बळी पडते. म्हणून फ्रॅग्रन्स-फ्री, हायपोअ‍ॅलर्जेनिक फेसवॉश वापरावा. गुलाबजल किंवा कॅमोमाइल बेस्ड टोनर वापरावा. मॉइश्चरायझरमध्ये पॅन्थेनॉल आणि सिरेमाइड्स असलेलं सौम्य उत्पादन वापरावं. मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरावं.
मेकअप किंवा धूळ मायक्लर वॉटरने साफ करून त्वचा सौम्य फेसवॉशने धुवा. नंतर सेंटेला युक्त सिरम किंवा स्किन-कॅलमिंग जेल लावा. मॉइश्चरायझरमध्ये सिरेमाइड्स व ग्रीन टी अर्क असलेले प्रॉडक्ट वापरावे. गरज असल्यास लिप बाम आणि आय क्रीमचा
वापर करा.

Gavkari Admin

Recent Posts

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

38 minutes ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

47 minutes ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

51 minutes ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

1 hour ago

पावसाळ्यात होणारे पोटाचे आजार

अन्नविषबाधा ः दूषित अन्न खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी आदी त्रास होतो. जुलाब व डायरिया ः…

1 hour ago

पावसाच्या सरींनी भिजलेल्या हिंदी चित्रपट गाण्यांचा मनमोहक प्रवास

वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्‍या पावसाच्या थेंबांमध्ये…

1 hour ago