मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणार वाटप
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेतून लाभ घेणार्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता एकत्रितपणे मिळणार आहेत.
या योजनेंंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये अशी एकूण 3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. ही रक्कम 10 ते 14 जानेवारीदरम्यान खात्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
महिला व बालविकास विभागाचे अधिकार्यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीपूर्वी महिलांना ही रक्कम मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 15 जानेवारी रोजी होणार्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महिन्यांचे हप्ते आधीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीची मागणी केली आहे. पुढील आठवड्यात रक्कम खात्यात जमा होऊ शकते. सध्या राज्यात सुमारे सव्वा कोटी महिलांना मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत आहे.
अधिकार्यांनी स्पष्ट केले की, मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘Beloved sisters’ will get two months’ worth of money together
महिलांच्या खात्यात 3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…