महाराष्ट्र

‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ आता एका क्लिकवर

कागदपत्रांची कटकट संपली, 1 लाख 1 हजारांची रक्कम थेट खात्यात जमा

मुंबई : प्रतिनिधी
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासनाकडून राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी ‘लेक लाडकी’ योजना आता अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यात आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना आता कागदपत्रांची जुळवाजुळव करत कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात (डीबीटी) जमा केली जाणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रियेतील किचकटपणा कमी होऊन जास्तीत जास्त गरजू मुलींना याचा वेळेवर आणि जलद लाभ मिळणे शक्य होणार आहे.
नव्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये आधार कार्डच्या मदतीने आवश्यक माहिती प्रणालीद्वारे आपोआप (ऑटो फेच) घेतली जाईल, तसेच लाभार्थी मुलगी आणि तिच्या माता-पित्यांचे ई-केवायसी केले जाईल. परिणामी, बँक खात्याचा तपशील किंवा अंगणवाडी केंद्राची स्वतंत्र माहिती देण्याची गरज उरणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योजनेच्या पुढील टप्प्यांतील लाभासाठी वारंवार अर्ज करण्याची कटकटही कायमची दूर करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या सवलतीनुसार, 1 एप्रिल 2023 पासूनच्या जुन्या पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, नव्याने नोंदणी करणार्‍या प्रकरणांमध्ये मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
मुलींबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या उद्देशाने या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचे टप्प्याटप्प्याने भरघोस अर्थसाहाय्य दिले जाते. यामध्ये मुलीच्या जन्मावेळी 5 हजार, पहिलीत गेल्यावर 6 हजार, सहावीत 7 हजार, अकरावीत 8 हजार आणि ती 18 वर्षांची झाल्यावर थेट 75 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंब महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक असून, त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या उत्पन्नाच्या व इतर अटींची पूर्तता करणे
अनिवार्य आहे.

Benefits of the ‘Lek Ladki’ scheme now available with just a click.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

2 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

9 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

14 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

25 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

37 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago