नाशिक

भगूरला 27 वर्षांनंतर करंजकरांच्या सत्तेला सुरुंग

राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्ष; शिंदे गटाचा पराभव

जोडी तुझी माझी

भगूर नगरपालिकेत तीन दाम्पत्य तीन वेगवेगळ्या पक्षांतून नगरपालिकेत निवडून आल्याने हा पण एक वेगळा विक्रम मानला जात आहे. नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या प्रेरणा बलकवडे यांचे पती विशाल बलकवडे हे प्रभाग 9 मधून विजयी झाले. त्यामुळे पत्नी नगराध्यक्षा आणि पती नगरसेवक तर त्यांच्याच घराण्यातील दीपक बलकवडे आणि त्यांच्या पत्नी विद्या बलकवडे हेदेखील दोन वेगवेगळ्या प्रभागातून भाजपाकडून निवडून आले. तर उबाठाकडून जयश्री देशमुख आणि काका देशमुख हे पती-पत्नी विजयी झाले. त्यामुळे भगूर नगरपालिकेत एकाच वेळी तीन दाम्पत्य निवडून आल्याने सभागृहात मिस्टरांबरोबरच होम मिनिस्टरही दिसणार आहेत.

27 वर्षांची परंपरा खंडित

गेल्या 20 वर्षांपासून भगूर नगरपरिषदेत शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांचे प्राबल्य होते. यंदा मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, उबाठा आदी पक्षांनी एकत्र येत शिंदे गटाला आव्हान दिले होते. आमदार सरोज अहिरे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. करंजकर यांच्या ताब्यात असलेली भगूर नगरपरिषद त्यांनी खेचून आणली.

विकासकामांना मतदारांचा कौल
भगूर शहरात अनेक कामे प्रलंबित आहेत. विरोधक ती कामे करू देत नसल्याने याचा राग मतदारांच्या मनात होता, तो राग त्यांनी मतदान करून दाखविला आहे.
– आमदार सरोज अहिरे

नाशिक : प्रतिनिधी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, उबाठा युतीचा विजय झाला असून, नगराध्यक्षपदी युतीच्या प्रेरणा बलकवडे या तब्बल 1900 मतांनी विजयी झाल्या. गेल्या 27 वर्षांपासून सत्ता राखणार्‍या शिवसेनेचे विजय करंजकर यांच्या सत्तेला अजित पवार गटाने सुरुंग लावला.
रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता विहितगाव येथील मनपाच्या शाळेतील मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या एकूण चार फेर्‍या झाल्या. नगराध्यक्षपदासाठी असलेल्या प्रेरणा बलकवडे यांना 5407 मते, तर शिंदे गटाच्या अनिता करंजकर यांना 3494 मते मिळाली. या निवडणुकीत भाजपला 6 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागा, उबाठा गटाला 2 जागा अशा युतीला 11 जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला 8 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच एक जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.
त्याचप्रमाणे 20 जागांसाठी असलेल्या नगरसेवकपदांच्या निवडणुकीत प्रभाग 1 मधून सागर विजय चंदमोर, शिंदे गट 720, कांता श्याम गायकवाड, शिंदे गट, 624, प्रभाग 2- कापसाबाई विजय साळवे, शिंदे गट, 530, शंकर किसान करंजकर, शिंदे गट, 520, प्रभाग 3 – जयश्री काकासाहेब देशमुख, उबाठा, 668, प्रसाद अंबादास आडके, भाजप, 707, प्रभाग 4 मधून सुजाता विशाल शिरसाठ, भाजप, 489, काकासाहेब जनार्दन देशमुख, उबाठा, 325, प्रभाग 5 मधून सुदेश माधव वालझाडे, शिंदे गट, 334, सुचित्रा उर्फ अर्चना मंगेश बुरखे, शिंदे गट, 303, प्रभाग 6 मधून मनीषा अंबादास कस्तुरे, शिंदे गट, 449, दीपक चिंदरनाथ बलकवडे, भाजप, 697, प्रभाग 7 मधून अमोल कचरू इंदरके, भाजप, 369, विद्या दीपक बलकवडे, भाजप, 498, प्रभाग 8 मधून बबलू दत्तू जाधव, राष्ट्रवादी अजित पवार, 594, लता रामदास ठापेकर, राष्ट्रवादी अजित पवार, 582, प्रभाग 9 मधून अश्विनी राहुल भवर, राष्ट्रवादी अजित पवार 554, विशाल गोरखनाथ बलकवडे, राष्ट्रवादी अजित पवार, 570, प्रभाग 10 मधून अजय हरिश्चंद्र वाहने, अपक्ष, 296, सोनाली विक्रम सोनवणे, शिंदे गट, 453 हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी घोषणा करीत विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. निकालाची घोषणा होताच राष्ट्रवादी, भाजप, उबाठा युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Bhagur ends Karanjkar's rule after 27 years
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago