नाशिक

कोयताधारींमुळे भंबेरी!

नाशिक : देवयानी सोनार
पुण्यात कोयताधारी युवकाला पोलीस कर्मचार्‍यांनी इंगा दाखविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोयताधारी युवकांनी गेल्या काही दिवसांपासून मोठा उच्छाद मांडला आहे. म्हसरूळ, पंचवटी या भागात दोन ते तीन दिवसांपूवीर्र्च एकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सामनगाव रोड, सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथेही कोयताधारी युवकांनी दहशत माजविण्याचा प्र्रयत्न केला.
गेल्या काही दिवसांपासून साधारण वीस ते बावीस या वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात हातात कोयता घेऊन दहशत पसरविताना दिसतात. नाशिकरोड येथे मध्यंतरी हातगाडीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरात हे सत्रच सुरू झाले आहे. कोयताधारींमुळे नागरिकांची एकीकडे भंबेरी उडत असताना पोलिसांचा काही धाकच दिसून येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
कोयते येतात कुठून?
बाजारात खेळणी मिळावी तसे सहजरीत्या कोयते उपलब्ध होत असून, हे कोयते येतात तरी कुठून? असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे. सहजरीत्या गावठी कट्टे, कोयते उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी फोफावली आहे. युवकांकडे हे धारदार कोयते येतात तरी कुठून, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. पोलिसांनी याचा शोध घेण्याची गरज असून, कोयते विक्री करणार्‍यांवर काही बंधने आहेत की नाही? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना सतावत आहे.
टवाळखोरांना आवरा
शहराच्या विविध भागात कोयताधारींबरोबरच टवाळखोरांनीही मोठा उच्छाद मांडला आहे. मागील महिन्यात सातपूर कॉलनी भागात टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन माजी नगरसेविका पल्लवी पाटील यांनी दिले. मात्र, काहीच फरक पडलेला नाही. रस्त्यात वाढदिवस साजरा करणे, जोरजोरात मोटारसायकल चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, पोलिसांप्रमाणे सायरन दुचाकीला बसवून तो वाजविणे, गर्दीतून भरधाव दुचाकी चालविणे असे प्रकार सातपूर, सिडको भागात सर्रास घडतात. त्यामुळे याला कुठेतरी पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
Ashvini Pande

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

12 hours ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

1 day ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

1 day ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago