मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भरवस फाटा येथे चक्काजाम आंदोलन

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भरवस फाटा येथे चक्काजाम आंदोलन
विंचूर : प्रतिनिधी

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणास बसले आहेत. त्यांना समर्थन म्हणून भरवसफाटा येथे अमित मुदगुल उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील व मुदगुल यांना पाठिंबा देण्यासाठी निफाड तालुक्यातील पूर्व भागातील ४६ गावातील ग्रामस्थांनी तब्बल तीन तास नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच शासन मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई करत आहे. न्यायालयीन पुर्तता करत नाही, मराठा सामाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भरवसफाटा येथे चक्काजाम आंदोलन केले. यासाठी भरवसफाटा बंदची हाक देण्यात आली होती. बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘जय जिजाऊ जय शिवराय, तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ व ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंत्री छगन भुजबळ तसेच राजकीय नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. यावरून मराठा समाजाचा आक्रोश दिसून आला. या आंदोलनात परिसरातील गोदेगाव, मरळगोई, गोळेगाव, दहेगाव, वाहेगाव, भरवस, मानोरी, वाकद, शिरवाडे, लासलगाव, विंचूर व परिसरातील तरूण व नागरिकांनी व शालेत विद्यार्थ्यांनीनी सहभाग नोंदवला. महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. चक्का जाम मुळे नाशिक – छत्रपती संभाजी नगर महामार्गावर तब्बल तीन तास वाहतुक कोंडी झाली होती. आंदोलनात सहभागी महिला व शालेय विद्यार्थिनींनी नायब तहसीलदार दिपाली खेडेकर यांना निवेदन दिले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे, स.पो.नि.राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
याप्रसंगी डॉ.सुजित गुंजाळ,गोपिनाथ ठुबे, शिवा सुराशे, निवृृृृती जगताप, ललित दरेकर, डॉ. श्रीकांत आवारे, लहानु मेमाने, भागवत बोचरे, प्रशांत भोसले, बापू भोसले, प्रवीण नाईक, संतोष पानगव्हाणे, विक्रम भोसले, बापू डुंबरे, महेेेेश मेथे, वाल्मिक मूदगूल, तात्या वावधाने, योगेश काळे, बन्शी जाधव , पंडित मुुुदगुल, पंंकज गिते, भाऊ जाधव, शांताराम जाधव, अंकुश तासकर, बाबासाहेब चिताळकर आदींसह परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्ते आक्रमक
बराच वेळ नाशिक- संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आल्याने पोलिसांनी आंदोलनाच्या आयोजकांना लवकर महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली. त्यावेळी काही कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर देखील काही कार्यकर्ते रस्त्यातच काही वेळ बसून होते. पोलिसांच्या आग्रही विनंती नंतर हे कार्यकर्ते महामार्गावरून बाजूला झाले.

…त्यांनी राजीनामे द्यावेत : सकल मराठा समाज
मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण, अजूनपर्यंत त्याला यश आले नाही. सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा लढा तीव्र करावा, गेल्या पाच वर्षांत सत्तेत सर्वच पक्ष सामील झाले; फोडाफोडीच्या राजकारणात शासनाला स्वारस्य आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या बाबत गांभीर्य नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीमाने द्यावेत.असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सदर आवाहनास जोरदार पाठींबा दिला.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago