जिडी किंग म्हणून ओळखले जाणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील भीष्माचार्य दिलीपकुमार यांची आज जयंती. 11 डिसेंबर 1922 रोजी दिलीप कुमार यांचा जन्म पेशावर येथे झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. पेशावरहून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. दिलीप कुमार यांच्यासह बारा भावंडे होते. त्यांच्या कुटुंबात पाहुण्यांचाही राबता होता, त्यामुळे आपणही काही तरी काम करून घरखर्चास मदत करावी असा विचार करून दिलीपकुमार पुण्याला आले. तिथे त्यांनी लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम केले.
दुसर्या महायुद्धात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि दिलीप कुमार जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परत आले. मुंबईला आल्यावर त्यांना पुन्हा नोकरी शोधावी लागली. दिलीपकुमार हे नोकरीच्या शोधात आहेत, हे त्यांचे परिचित डॉ. मसानी यांना समजले. डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथील बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओत देविका राणी यांच्याकडे घेऊन गेले. देविका राणी यांनी दिलीपकुमार यांचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील पकड पाहून त्यांना महिना बाराशे रुपये पगारावर अभिनय करण्याची ऑफर दिली. वास्तविक हा प्रस्ताव दिलीपकुमार यांना मान्य नव्हता. कारण चित्रपटात अभिनय करावा असा विचार त्यांनी कधीही केला नव्हता, पण महिना बाराशे रुपये मिळतात, ही रक्कम त्याकाळी खूप मोठी होती त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि देशाला एक महान अभिनयसम्राट मिळाला. देविका राणी यांनीच त्यांना दिलीपकुमार हे नाव दिले.
1944 साली आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात केली. 1944 ते 98 पर्यंत म्हणजे सहा दशकापेक्षा अधिक काळ दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनयाने गाजवून सोडला. यादरम्यान त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. अंदाज, राम और श्याम, आन, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, नया दौर हे त्यांचे चित्रपट तर सुपरहिट झाले. या चित्रपटांनी तरुणाईला वेड लावले. 1957 साली आलेल्या गंगा जमुना या चित्रपटातील मांग के साथ तुम्हारा…मैने मांग लिया संसार….या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. या चित्रपटात वैजयंती माला या त्यांच्या नायिका होत्या. चित्रपटरसिक त्यांच्या अभिनयाने इतके भारावले होते की, त्याकाळच्या तरुणांचे ते आयडॉल बनले. देवदास या चित्रपटातील त्यांची भूमिका ही तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे नंतर अनेक अभिनेत्यांनी अनुकरण केले, पण कोणालाही त्यांच्या अभिनयाच्या जवळपास पोहोचता आले नाही. 1976 साली आलेला बैराग हा चित्रपट त्यांचा नायक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी तिहेरी भूमिका साकारली. त्यानंतर काही काळ ब्रेक घेऊन त्यांनी मनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
शक्ती, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या. सुभाष घई यांच्या सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. 1998 साली आलेला किला हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ठरला. यादरम्यान त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दिलीपकुमार यांना आठ पुरस्कार मिळाले. भारत सरकारनेही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची योग्य दखल घेऊन पद्मभूषण, पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरवले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. पाकिस्ताननेही त्यांना निशान- ए-इम्तियाज या त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे. 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचेच नाही, तर देशाचे मोठे नुकसान झाले. दिलीपकुमार यांच्या निधनाने अभिनयातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला. त्यांचासारखा अभिनेता पुन्हा होणार नाही. अभिनयातील भीष्माचार्य, अभिनयसम्राट दिलीपकुमार यांना अभिवादन!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…