नाशिक: प्रतिनिधी
मराठा आरक्षण लढाई मुळे मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून, काल विधिमंडळात छगन भुजबळ यांनी आपल्यावर गोळी बार होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळ फार्म येथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच भुजबळ फार्म भोवती पोलिसांचा कडक पहारा सुरू झाला आहे,
मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये, यासाठी छगन भुजबळ यांनी कडवा विरोध केला आहे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील ठाम आहेत, गेल्या काही सभांमधून जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टोकाची टीका केली,सोशल मीडियावर देखील भुजबळ यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यामुळे काल विधिमंडळ मध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होत असताना भुजबळ यांनी आपल्यावर गोळी चालवली जाऊ शकते, असा दावा केला होता. त्यामुळे शासनाने भुजबळ यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन भुजबळ फार्म भोवती बंदोबस्त वाढवला आहे, बीड येथे संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर भुजबळ फार्म भोवती बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…