विरगांव येथे बिबट्याचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला

सटाणा प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील विरगाव येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळींच्या कळपावर हल्ला करुन ८ शेळ्या फस्त केल्यात गावात बिबट्या शिरल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरगांव येथील धोंडू शंकर सोनवणे यांच्या शेळींच्या वाड्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून ८ शेळ्यांना ठार केले. तर एका शेळीला गंभीर जखमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. यामुळे सोनवणे यांना आर्थिक नुकसान झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. करंजाडी खोऱ्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. बिबट्यांचे वास्तव्य उसाच्या शेतीमध्येच राहात होते. उस तोडणी सुरू झाल्यामुळे त्याचे वास्तव्य धोक्यात आल्याने ते मानवी वस्तींकडे चाल करू लागले आहेत. गावात बिबट्या शिरल्यामुळे विरगांव व परिसरातील गावे दडपणाखाली आली आहेत.
Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago