अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

विनयनगरला  अनधिकृत बांधकामावर हातोडा

दीडशे पोलिसाच्या बंदोबस्तात कारवाई

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

नाशिक महापालिकेच्या अतिक्रम विभागाने मंगळवारी (दि.7) मोठी कारवाई करत विनय नगर येथील नऊ  अनधिकृत बांधकामावर जेसीबीने जमिनोदोस्त करण्यात आली. मंगळवारी दुपारी एक वाजेपासून या मोहीमेला सुरुवात झाली.

 

जिल्हा न्यायालय, नाशिक येथे सर्व अनधिकृत बांधकाम धारकांनी मनपा विरुध्द़ दावे दाखल केले होते. ते सर्व दावे न्यायालयाने फेटाळून लावले. कारवाई होण्यापूर्वी  नगरनियोजन विभागामार्फेत प्रथम व अंतीम नोटीस संबधीतांना निष्कासन खर्चासह देण्यात आलेल्या होत्या. सदरची मोहीम राबवितांना त्यामध्ये एकुण 14 ते 15 मिळकतीपैकी 9 मिळकती पाडण्यात आल्यात.

 

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त़ अतिक्रमण करुणा डहाळे, मनपाचे सहाही विभागीय अधिकारी अतिक्रमण पथकासह तसेच कार्यकारी अभियंता, नगरनियोजन विभाग, संजय अग्रवाल व त्याचे अधिपत्याखालील सर्व अभियंते  यावेळी उपस्थित होते. सदर मिळकती निष्कासीत करतांना कायदा व सुव्य़वस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिस आयुक्त़ यांनी सदरची बांधकामे निष्कासनासाठी पुरविण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्त़ांमध्ये एक पोलीस उपायुक्त,  दोन सहायक पोलीस आयुक्त, सहा पोलिस निरिक्षक तसेच महिला व पुरुष असे तब्बल 150 पोलिस बंदोबस्त़ होता. पाच  जेसीबी, दोन पोकलॅन यांचा वापर करुन मोहीम यशस्वी करण्यात आली. नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना या मोहीमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करणेत येते की, ज्या मिळकती अनधिकृत व विना परवाना असतील त्यांनी स्वत़: हून काढून घ्याव्यात अन्य़था मनपा कडून कारवाई करेल असा इशारा मनपा आयुक्त़ तथा प्रशासक डॉ. पुलकुंडवार यांनी दिला आहें. दरम्यान या कारवाई मुळे अनधिकृत अतिक्रम धारकांनाचे धाबे दानानले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *