नाशिक

भोंदू अशोक खरातच्या पैशांतून पुण्यात मोठी गुंतवणूक?

सीए प्रकाश पोफळेची 150 कोटींची मालमत्ता एसआयटीच्या रडारवर

पुणे/नाशिक : विशेष प्रतिनिधी
अटकेत असलेला स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असलेल्या एसआयटीला पुण्यात धक्कादायक माहिती मिळाली आहे. खरातचा जवळचा विश्वासू आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करणारा सीए प्रकाश पोफळे याने पुण्यातील सर्वांत महागड्या समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क परिसरात मोठी गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे.

मनी लाँड्रिंगचा संशय
तपास यंत्रणांना संशय आहे की, अशोक खरातने सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांना मंत्रतंत्राच्या जाळ्यात ओढून जो कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा कमावला, तो या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला आहे. ’शिवनिका’ ट्रस्ट आणि इतर बेनामी मार्गांनी जमा झालेला पैसा पांढरा करण्यासाठी सीए प्रकाश पोफळेचा वापर झाला का? यादृष्टीने आता एसआयटी तपास करत आहे.

महत्त्वाचे खुलासे

1. जुन्या व्यवहारांचे नूतनीकरण : 35 वर्षांपूर्वीच्या काही जुन्या व्यवहारांचे अचानक 2024 मध्ये ’कन्फर्मेशन डीड’ करण्यात आले आहे, जे संशयास्पद मानले जात आहे.
2. हवाला आणि परदेश कनेक्शन : काही सूत्रांच्या माहितीनुसार, खरातचा दुसरा एक सहकारी (ललित पोफळे) याने खरातचे 100 कोटी रुपये दुबईला पाठवल्याचा आणि 300 कोटींच्या हवाला व्यवहाराचादेखील संशय आहे.
3. उद्योजकांवर गारूड : सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे माजी चेअरमन नामकर्ण आवारे यांच्या आत्मचरित्रात खरातचे 13 पानांचे गुणगान आढळले आहे, ज्यावरून खरातने समाजातील प्रतिष्ठित वर्गाला कसे भुरळ घातली होती, हे स्पष्ट होते.

पुढील कारवाई

पुणे पोलिसांनी या मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, आयकर विभाग आणि ईडी या प्रकरणाची दखल घेण्याची शक्यता आहे. या सीएने इतकी मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले, याचा शोध आता बँक खात्यांमधील ट्रॅन्झॅक्शनवरून घेतला जात आहे.

मालमत्तेचा तपशील आणि तफावत

* क्षेत्रफळ : कोरेगाव पार्क येथे सुमारे 49 ते 50 गुंठे (जवळपास 50 हजार स्क्वेअर फूट) मोकळी जागा.
* बांधकाम : याच परिसरात 8 ते 9 अलिशान रो-हाउसेस
* किंमत : कागदोपत्री या व्यवहाराची नोंद केवळ 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र, कोरेगाव पार्कसारख्या भागात या मालमत्तेचा आजचा बाजारभाव 100 ते 150 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Big investment in Pune with the money of fraudster Ashok Kharat?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

21 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago