नाशिक: प्रतिनिधी
नाशिकला महायुतीच्या उमेदवारी वरून मोठा ट्विस्ट आला आहे, अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसताना शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने अजून कोणालाही अधिकृत उमेदवारी दिलेली नसतानाच आज शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरल्याने मोठा ट्विस्ट आला आहे, या जागेसाठी हेमंत गोडसे देखील इच्छुक आहेत, याशिवाय छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, तर मध्यंतरी अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती, शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना एबी फार्म दिलेला नाही, त्यामुळे नाशिकमध्ये महायुती चा उमेदवार कोण? हे कोडे अजूनही कायम आहे.