नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले होते, मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांत आयुक्तपदी वर्धा येथील जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच शासनाने कर्डीले यांची नियुक्ती रद्द करत पुन्हा मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत, महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या मनीषा खत्री या सध्या एनएम आर डी ए प्राधिकरण च्या सीइ ओ आहेत.