सून, दोन वर्षांची नात गंभीर जखमी
सिन्नर : प्रतिनिधी
रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर पाणी मारणार्या टँकरच्या चाकाखाली सापडून 52 वर्षीय दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पांगरी ते मर्हळ रस्त्यावर मर्हळ बुद्रुक शिवारात घडली. बुधवारी (दि.20) दुपारी 3 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मृताची 25 वर्षीय सून व दोन वर्षांची नातही गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टँकरचालकाने मद्य सेवन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
चिंधू उर्फ हरिभाऊ सुखदेव कुर्हे (52, रा. मर्हळ बुद्रुक) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची सून कल्याणी ऋषिकेश कुर्हे (25) व नात स्वाती (2) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. सुनेला आणि नातीला दुचाकीवर घेऊन सोमठाणे येथे माहेरी सोडविण्यासाठी हरिभाऊ कुर्हे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मर्हळ – पांगरी रस्ता काँक्रिटीकरणाचा एक पदर पूर्ण झाला आहे.
तर दुसर्या बाजूला पावसामुळे पूर्ण चिखल होता. त्यामुळे दुचाकी काँक्रीटच्या पदरावरून जात होती तर याच कामावर पाणी मारण्यासाठी असलेला खासगी ठेकेदाराचा टँकर (एमएच 15, बीजे 4513) हा मागे येत असताना पांगरी बाजूकडून मर्हळच्या दिशेने जाणार्या दुचाकीला टँकरचा धक्का लागला. समृद्धी महामार्गाच्या अंडरपासपासून काही अंतरावर अर्जुन कुटे यांच्या बंगल्याजवळ हा अपघात झाला. टँकरचा धक्का लागून दुचाकी घसरली. दुचाकीचालक चिंधू उर्फ हरिभाऊ सुखदेव कुर्हे (52, रा. मर्हळ बुद्रुक) हे टँकरच्या चाकाखाली सापडले. तर सोबत असलेली त्यांची सून कल्याणी ऋषिकेश कुर्हे (25), नात स्वाती (2) यादेखील काँक्रीट रस्त्यावर फेकल्या गेल्या. कल्याणी यांच्या कमरेला मार लागून तर नात स्वाती ही डोक्यावर आपटून दोघीही गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर बाजूच्या शेतामध्ये काम करणारे शेतकरी मदतीला धावले. त्यांनी टँकरचालकाला थांबवून ठेवले. पांगरी येथून खासगी रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही उपचारासाठी सिन्नरला नेण्यात आले. मात्र, सिन्नरला पोहोचण्यापूर्वीच हरिभाऊ कुर्हे यांचा मृत्यू झाला.
सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून हरिभाऊ कुर्हे यांचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक अमोल गोडे यांनी अपघातस्थळी तसेच सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…