नाशिक

आता घरगुती ग्राहकांना स्वस्त वीजदर

स्मार्ट वीज मीटरधारक 1 लाख 42 हजार; नाशिक परिमंडळात वीजबिलात 30 लाखांची सवलत

नाशिक : प्रतिनिधी
महावितरणच्या टीओडी स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीजवापरावर वीजबिलात टीओडी सवलत लागू झाली असून, नाशिक परिमंडळातील एकूण 1 लाख 42 हजार 608 स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळून एकूण 30 लाख 83 हजार रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. 1 जुलैपासून सुरू झाला असून, महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
दरम्यान, नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होणार असल्याने अचूक बिले मिळतील आणि घरातील विजेचा वापर दर अर्धा तासाला संबंधित ग्राहकांना मोबाइलवर पाहता येणार आहे. त्यामुळे वीजवापरावर देखील थेट नियंत्रण राहणार आहे. तर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशिन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
टाइम ऑफ डे प्रणालीनुसार वीजवापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, सन 2027 मध्ये 85, सन 2028 व 29 मध्ये 90 पैसे तसेच सन 2030 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा, मग मासिक बिल भरा, अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

टीओडी मीटरचे प्रमुख फायदे

स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यांसह ज्यांच्याकडे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प आहे, त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोखा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago