नाशिक : प्रतिनिधी
बिपीन बाफना खून खटल्याचा निकाल तब्बल अकरा वर्षानंतर लागला. याप्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.
बिपीन बाफना या युवकाचे 10 जून 2013 रोजी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांची यापूर्वीच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तर दोघांना दोषी ठरविले होते. सरकार पक्षातर्र्फे एकूण 35 साक्षीदार तपासण्यात आले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…