उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

धार्मिक विधीच्या नावाखाली पती-पत्नी बनून आले अन…
त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
नाशिक येथील एका प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (40, राहणार गांधी नगर ) आणि रूपाली महेश जाधव (35, राहणार जाधव संकुल सातपूर) यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या  लॉज येथे रुम घेतली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते मुक्कामी आले होते. धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तानाजी चौधरी याने आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख म्हणून सादर केले.तशी रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान महिलेला उलटया होत आहेत म्हणून ती बाहेर आली.त्यानंतर तेथे काम करणा-या रूम बॉयला संशय आल्याने त्याने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता तेथे किटनाशक तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या,मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्‍वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची अवस्था पाहून तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवले. तेथे सकाळी 6.30 वाजता तानाजी चौधरी हा मृत झाला तर रूपाली जाधव हिची दुपारी 4.30 वाजता प्राणज्योत मालवली.त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago