नाशिक

सातपूरमध्ये भाजपाचेच वर्चस्व; चार प्रभागांत भाजपाचे 14, तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील सातपूर भागात भाजपाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. सातपूरमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाचे चार, तर शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून आला. प्रभाग 9 मध्ये चार उमेदवारांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. प्रभाग 10 मध्ये शिवसेनेच्या एका उमेदवाराचा विजय झाला, तर भाजपाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला. प्रभाग 11 मध्येदेखील भाजपाचे संपूर्ण पॅनल निवडूून आले आहे. एकंदरीत सातपूरच्या चारही प्रभागांत भाजपाची घोडदौड दिसली. चार प्रभागांत 16 पैकी 14 जागांवर भाजपाने विजय मिळवला, तर दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

लाडक्या बहिणींना पसंती

सातपूरच्या चार प्रभागांत 16 नगरसेवकांपैकी दहा महिला नगरसेविका निवडून आल्याने सातपूरकरांनी लाडक्या बहिणींना पसंती दिल्याचे दिसते. सातपूरच्या चार प्रभागांत भाजपाच्या नऊ महिला नगरसेविका, तर एक शिवसेना शिंदे गटाची नगरसेविका असेल. महिलांचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसले आहे.

विरोधी पक्ष हद्दपार

राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मात्र सातपूरकरांनी नाकारल्याचे चित्र आहे. काही प्रभागांत शिवसेना उबाठा व मनसे, काँग्रेसचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

विलास शिंदेंचा 284 मतांनी विजय

नाशिकमधील मातब्बर मानल्या जाणार्‍या शिवसेना शिंदे गटाच्या विलास शिंदे यांचा प्रभाग 8 (ड)मध्ये अवघ्या 284 मतांनी विजय झाला. प्रभागात इतर तिन्ही उमेदवार भाजपाचे निवडणून आले. प्रभाग 8 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पॅनल निवडून येईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला धोबीपछाड देत आपले आपले वर्चस्व सिद्ध केले.

लोंढे परिवारातील सासरा-सुनेचा पराभव

प्रभाग क्रमांक 11 अ मधून आरपीआय आठवले गटाकडून निवडणूक लढविणार्‍या दीक्षा लोंढे व प्रभाग क्रमांक 11 ड मधून आरपीआय आठवले गटाकडून कारागृहातून निवडणूक लढविणारे प्रकाश लोेंढे यांचा पराभव झाला.

दिनकर पाटील सहाव्यांदा नगरसेवक

प्रभाक क्रमांक 9 (ब) मधून निवडून आलेले दिनकर पाटील सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्यासह त्यांचे पुत्र अमोल पाटील हेही प्रभाग क्रमांक 9 (ड) मधून विजयी झाले. पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

शेख पती-पत्नीचा पराभव

मनसेकडून प्रभाग 10 मधून निवडणूक लढविणार्‍या फरिदा शेख आणि प्रभाग 11 मधून निवडणूक लढविणारे सलीम शेख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्रभाग क्रमांक 8 अ
कविता लोखंडे- 8,022 (भाजपा, विजयी)
नयना गांगुर्डे- 7,603 (शिवसेना शिंदे गट)
दीपाली कोथमिरे- 2,455 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 8 ब
उषा बेंडकोळी- 9,044 (भाजपा, विजयी)
विष्णुपंत बेंडकोळी- 6,751 (शिवसेना शिंदे गट)
विशाल गुंबाडे- 3,219 (मनसे)
प्रभाग क्रमांक 8 क
अंकिता शिंदे- 8,622 (भाजपा, विजयी)
कविता गायकवाड-8,349 (शिवसेना शिंदे गट)
गायत्री निगळ- 2,433 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 8 ड
विलास शिंदे- 8,189 (शिवसेना शिंदे गट, विजयी)
प्रवीण पाटील- 7,905 (भाजपा)
किरण जाधव- 1,989 (मनसे)
प्रभाग क्रमांक 9 अ
भारती धिवरे- 11,932 (भाजपा, विजयी)
शकुंतला पवार- 4,880 (शिवसेना शिंदे गट)
अनिता वाव्हळ- 2,095 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 9 ब
दिनकर पाटील- 13,376 (भाजपा, विजयी)
गुलाब माळी- 3,933 (शिवसेना शिंदे गट)
कावेरी कांडेकर- 2,827 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 9 क
संगीता घोटेकर- 9,794 (भाजपा, विजयी)
सविता गायकर- 7,187 (शिवसेना शिंदे गट)
छाया इंगवले- 2,240 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 9 ड
अमोल पाटील- 12,444 (भाजपा, विजयी)
प्रेम पाटील- 5,172 (शिवसेना शिंदे गट)
साहेबराव जाधव- 2,424 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 10 अ
विश्वास नागरे- 10,475 (भाजपा, विजयी)
अरुण घुगे- 6,759 (शिवसेना शिंदे गट)
शशिकांत जाधव- 2,506 (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 10 ब
इंदूबाई नागरे- 9,769 (शिवसेना, विजयी)
कलावती सांगळे- 9,303 (भाजपा)
फरिदा शेख- 5,079 (मनसे)
प्रभाग क्रमांक 10 क
माधुरी बोलकर- 10,775 (भाजपा, विजयी)
पल्लवी पाटील- 7,179 (शिवसेना)
डॉ. वृषाली सोनवणे- 6,980 (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 10 ड
समाधान देवरे- 12,820 (भाजपा, विजयी)
नंदू जाधव- 5,837 (शिवसेना)
विशाल भावले- 3,811 (मनसे)

प्रभाक क्रमांक 11 अ
सविता काळे- 7,091 (भाजपा, विजयी)
दीक्षा लोंढे- 6,605 (आरपीआय आठवले गट)
योगेश गांगुर्डे- 4,544 (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 11 ब
मानसी शेवरे- 9,049 (भाजपा, विजयी)
नंदिनी जाधव- 4,547 (आरपीआय आठवले गट)
रेणुका लहारे- 4,140 (मनसे)
प्रभाग क्रमांक 11 क
सोनाली भंदुरे- 7,020 (भाजपा, विजयी)
गीता जाधव- 5,975 (मनसे)
सीमा निगळ- 5,958 (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 11 ड
नितीन (बाळा) निगळ- 6,685 (भाजपा, विजयी)
सलिम शेख- 5,303 (मनसे)
प्रकाश लोंढे- 4,679 (आरपीआय आठवले गट)

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago