नाशिक

प्रभाग सातमध्ये भाजपाचे वर्चस्व

शिवसेना शिंदे गटाचे अजय बोरस्ते विजयी, हिरेंना धक्का

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (2026) प्रभाग क्रमांक 7 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या प्रभागात भारतीय जनता पक्षाने तीन जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर शिवसेनेने (शिंदे गट) एका जागेवर यश मिळवले.
शहरात 31 प्रभागांतील 122 जागांसाठी दि. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक पार पडली. मतमोजणी शुक्रवारी (दि.16) करण्यात आली. 7, 12 व 24 या प्रभागांची मतमोजणी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाली.
या मतमोजणीत भाजपचे सुरेशअण्णा पाटील यांनी दहा हजार 695 मते मिळवून प्रतिस्पर्धी राजेंद्र सूर्यवंशी यांचा आठ हजार 279 मतांनी पराभव केला. महिलांच्या जागेवर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांनी 11 हजार 184 मते मिळवत शिवसेनेच्या रोहिणी शिरसाठ यांच्यावर नऊ हजार 992 मतांनी मात केली.
तिसर्‍या जागेवर भाजपच्या स्वाती भामरे यांनी 11 हजार 740 मते मिळवून शिवसेनेच्या वंदना रकिबे यांचा सात हजार 062 मतांनी पराभव केला. शिवसेनेला (शिंदे गट) या प्रभागात दिलासा देणारा विजय अजय बोरस्ते यांनी मिळवला. त्यांनी 13 हजार 022 मते घेत भाजपचे योगेश हिरे यांचा सहा हजार 920 मतांनी पराभव करीत शिवसेनेची एकमेव जागा कायम राखली. प्रभाग 7 मध्ये प्रसाद मंगल कार्यालय, थत्तेेनगर, गोळे कॉलनी, डिसूझा कॉलनी, पोलीस हेडक्वार्टर, पंडित कॉलनी, पाटील लेन, रुंग्ठा हायस्कूल परिसर, घारपुरे घाट, जेहान सर्कल, कुसुमाग्रज गार्डन, सप्तशृंंगी कॉलनी, डोंगरे वसतिगृह परिसर, अशोक स्तंभ एवढी परिसराची व्याप्ती आहे.
प्रभाग क्रमांक 7 मधील या निकालातून मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोेष करत आनंद व्यक्त केला.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago