पाथर्डीफाटा येथे महाविकास आघाडीविरोधात भाजपाची निदर्शने

पाथर्डी फाटा येथे भाजपाचे महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी
सिडको : विशेष प्रतिनिधी

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली असताना फक्त आणि फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे. पाथर्डी फाटा येथे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले त्यांच्या विरोधात भाजपाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, प्रशांत जाधव,सागर शेलारआदींसह कार्यरते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *