लाडकी बहीण योजना अ‍ॅप, पोर्टलद्वारे दीड कोटी महिलांचे अर्ज

लाडकी बहीण योजना अ‍ॅप, पोर्टलद्वारे दीड कोटी महिलांचे अर्ज
नाशिक ः देवयानी सोनार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील  विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार. या योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये 16 ऑगस्टपासून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम शासनाकडून चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे. याचाच परिपाक म्हणून नाशिक जिल्ह्यात नाशिक शहर आणि ग्रामीण भाग आघाडीवर असून, पेठ, सुरगाणा आदी आदिवासी भागात योजनेचे
फॉर्म कमी आल्याचे चित्र आहे.
अ‍ॅपद्वारे एकूण 73 लाख 8 हजार 1 अर्ज आले आहेत. पोर्टलद्वारे 56 लाख 6 हजार 57 अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 1 कोटी 30 लाख 4 हजार 58 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे तालुकानिहाय आकडेवारी प्राप्त झाली असून, यामध्ये नाशिक तालुका आघाडीवर तर पेठ, सुरगाणा पिछाडीवर आहे.ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरले नाही अशा महिलांना शासनाकडून योजनेचा अर्ज भरून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच फॉर्म भरताना येणार्‍या अडचणी आधार कार्ड सीडिंग केले नसल्यास करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा
पात्र असलेली महिला ऑनलाइन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील. भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचार्‍यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
तालुका अ‍ॅपद्वारे   पोर्टलद्वारे   एकूण
बागलाण    43,387   38,908         82,295
चांदवड    35,688   21,799       57,487
देवळा    19,643      14,092       33,135
दिंडोरी    57,576     27,805       79,381
इगतपुरी  30,979    26,524       57,503
कळवण   30,001     19,518     49,519
मालेगाव   1,01,921    90,310     1,92,231
नांदगाव   32,551     26,200        58.751
नाशिक   1,66,073      1,50,982     3,17,055
निफाड   65,767        48,976         1,14,743
पेठ      19,876     9,550         29,426
सिन्नर 47,002 34,944 81,946
सुरगाणा 31,341 14,991 46,332
त्र्यंबक 26,873 13,831 40,704
येवला 35,323 27627 62,950
एकूण 7,38,001 5,66,057 13,04,058

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *