नाशिकरोडमध्ये भाजप-शिंदेसेना-उबाठात टशन

भाजपचे चार प्रभागांत धक्कातंत्र, उमेदवारी डावलल्याने इच्छुकांत नाराजी

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकरोड विभागात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहावयास मिळाल्या. भाजपने चार विद्यमान माजी नगरसेवकांचा पत्ता कट करत धक्कातंत्र वापरले. दरम्यान, नाशिकरोडच्या बालेकिल्ल्यासाठी भाजप-शिंदेसेना व ठाकरे गटात कमालीचा संघर्ष होणार आहे.
नाशिकरोड विभागात प्रभाग 17 ते 22 असे सहा प्रभाग येतात. यातील अडीच प्रभाग देवळाली मतदारसंघ तर उर्वरित प्रभागाचा परिसर नाशिक पूर्व मतदारसंघात येतो. त्यामुळे नाशिकरोड विभाग विशेषत: नाशिक पूर्व विधानसभेकरिता अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रभागावर वर्चस्व ठेवण्याकरिता आ. राहुल ढिकले यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. प्रभाग सतरातून भाजपने उमेदवारी नाकारल्याने इच्छुक शहर उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याने भाजपला धक्का दिला.
विद्यमान नगरसेवकांविरोधात प्रभागात नाराजी असल्याचे आरोप राजेश आढाव यांनी करत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, गतवेळेप्रमाणे यंदाही पक्षाने डावलल्याने राजेश आढाव यांनी शिंदेसेनेची साथ धरली. दरम्यान, भाजपने प्रभाग सतरामध्ये धक्कातंत्राचा वापर करत माजी नगरसेविका तथा माजी आ. बाळासाहेब सानप समर्थक अनिता सातभाई यांचाही पत्ता कट करत शोभा सातभाई यांना उमेदवारी दिल्याने हा
चर्चेचा विषय झाला. शिंदेसेनेचे गणेश गडाख यांच्या पत्नी नीलम गडाख यांना भाजपने गळाला लावत उमेदवारी दिली. प्रभाग अठरातून माजी नगरसेविका मीरा हांडगे यांना भाजपने उमेदवारी नाकारली. प्रभाग 20 मध्ये भाजपने माजी नगरसेवक अंबादास पगारे यांच्याऐवजी सतीश निकम तर प्रभाग 19 मधून पंडित आवारे यांना थांबवत योगेश ताजनपुरे यांना उमेदवारी दिली. यानंतर आवारे यांनी शिंदेसेनेची वाट धरत उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रभाग 17 मधील उमेदवार

ठाकरे गट – मंगला आढाव, मंगेश मोरे, शैलेश ढगे, प्रमिला मैद,
शिंदेसेना – राजेश आढाव, राहुल कोथमिरे, विजयता डावरे, सुशीला लोखंडे

प्रभाग 18 मधील उमेदवार

भाजप – विशाल संगमनेरे, शरद मोरे, ज्योती माळवे, सुशीला बोराडे
शिंदेसेना – सुनीता भोजने, सुनील बोराडे, रंजना बोराडे, शीतल ताकाडे, आशा पवार
ठाकरे सेना- चित्रा ढिकले, प्रशांत भालेराव, रोहिणी पिल्ले, संजय ढिकले
राष्ट्रवादी- योगेश निसाळ, रोहिणी गाढे, वंदना बोराडे

प्रभाग 19 मधील उमेदवार

भाजप – योगेश ताजनपुरे, स्वाती वाकचौरे, हेमांगी भागवत
शिंदेसेना – पंडित आवारे, जयश्री खर्जूल, विशाखा भडांगे,
ठाकरे सेना – योगेश भोर, भारती तानजपुरे, रुचिका साळवे,

प्रभाग 20 मधील उमेदवार

भाजप – संभाजी मोरुस्कर, सीमा ताजणे, सतीश निकम, जयश्री गायकवाड
ठाकरे सेना – हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, अश्विन पवार, गायत्री गाडेकर (शरद पवार गट)
शिंदेसेना – कैलास मुदलियार, सुप्रिया कदम, दूर्गा चिडे, पी. के. बागूल

प्रभाग 21 मधील उमेदवार

भाजप – नितीन खोले, श्वेता भंडारी, कोमल मेहरोलिया, जयंत जाचक
शिंदेसेना – सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, नयना वाघ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
ठाकरे सेना – प्रशांत जाधव, सुधाकर जाधव, अश्विनी आवटे, अनिता निकाळे

प्रभाग 22अ मधील उमेदवार

ठाकरे सेना – केशव पोरजे, योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे, वैशाली दाणी
राष्ट्रवादी अजित पवार गट – विक्रम कोठुळे, गणेश खर्जूल, दीपाली कोरडे, संध्या पवार
भाजप – श्याम गोहाड, सुनीता कोठुळे, नयना घोलप, मीनाक्षी जाधव

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *