नाशिक

‘महापौर’साठी भाजपात चढाओढ

सोडत निघताच नाशकात घडामोडी

दीपाली गिते, हिमगौरी आडके, योगिता हिरे, माधुरी बोलकर, स्वाती भामरे यांची नावे चर्चेत

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मुंबईत महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नाशिक महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेला सुटले आहे. दरम्यान, भाजपकडून कोणाला महापौरपदाची संधी मिळणार? यावरून विविध नावांवरून शहरभरात चर्चा रंगली आहे.
यात माजी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते, माजी स्थायी सभापती हिमगौरी आडके, स्वाती भामरे यांच्यासह इतर महिलांच्या नावांची गुरुवारी दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, चांगला चेहरा नाशिकच्या महापौरपदासाठी दिला जाणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे. महापौर निवडीत आमदारांचे लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि कोअर कमिटीतील गणित यावर अंतिम निर्णय अवलंबून असेल. भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नवख्या चेहर्‍याला संधी देणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, हा काळ नाशिक शहरासाठी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचे देशभरच नव्हे, तर जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच प्रशासकीय समज, राजकीय तोल आणि स्वच्छ प्रतिमा असलेला महापौर देणं भाजपसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

दोन-तीन दिवसांत नाव जाहीर

आरक्षणावर पडदा पडल्यानंतर भाजपकडून येत्या दोन-तीन दिवसांत महापौरपदाचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गटनोंदणी महसूल आयुक्तांकडे केली जाणार आहे.

BJP tussle for ‘Mayor’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago