नाशिक

महापौरपदासाठी भाजपचे धक्कातंत्र?

अनपेक्षित चेहरा, इच्छुकांना धसक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविलेला भाजप एक-दोन दिवसांत महापौरपदाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघल्याने पक्षात लॉबिंगला सुरवात झाली आहे. महापौरसाठीची संभाव्य काही नावे गुरुवारपासून चर्चेत येत आहेत. मात्र, असे असले, तरी पक्षाकडून ऐनवेळी नवा चेहरा समोर आणण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपमधील या धक्कातंत्राचा लॉबिंग करणार्‍यांनीदेखील धसका घेतल्याचे बोलले जात आहे.

भाजपने 122 पैकी 72 जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. शिंदेसेनेला कुठलीही हालचाल करण्याची संधी भाजपने ठेवली नसल्याने सर्वकाही एकट्या भाजपच्या हाती आले आहे. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर पदाशिवाय स्थायी सभापती, उपमहापौर, सर्वाधिक स्थायी सदस्य व विभागीय प्रभाग सभापती भाजपकडे येणार आहे. तत्पूर्वी, महापौरपदाचे नाव जाहीर केले जाणार आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडण्याची शक्यता असताना अनपेक्षितपणे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण सोडत निघाल्याने अनेकांना महापौरपदाचे स्वप्न पडून लागले आहे. महिला नगरसेवकांच्या पती व कुटुंबातील सदस्यांकडून थेट वरिष्ठांकडे सेटिंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी अद्याप कोणालाही आश्वासन न देता संबंधितांना वेट अ‍ॅड वॉचच्या सूचना करत आहेत. काहींकडून एवढी घाई केली जात आहे की, विविध मार्गाद्वारे मंत्री व मुंबईत वजन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

मंत्री महाजनच नाव ठरवणार
भाजपने नाशिक महापालिकेची निवडणूक मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच लढली आणि ती यशस्वीपणे पार पाडत त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमतही मिळवून दिले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपत गोंधळ उडाला होता. परंतु त्याचा भाजपवर काहीएक परिणाम झाला नाही. दरम्यान, महापौर, स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाच्या पदांसाठी आपल्या समर्थकांना संधी मिळावी, अशी इच्छा पक्षाच्या तीनही आमदारांची आहे. पण कोणाला कोणते पद द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मंत्री महाजनांच्या हाती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाच्या नावाची घोषणा होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago