महाराष्ट्र

भाजपाचा गनीमा कावा !

 

राज्यात महाराष्ट्र विधानपरीषद निवडणुकीचे बिगूल वाजले असून आता तर अर्ज भरण्याची मूदतही संपुष्टात आलीय. नाशिक पदवीधर मधून तीन वेळेसचे आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्रासमवेत शेवटच्या क्षणाला कॉग्रेसलाच धक्का देत मुलाचा अपक्ष अर्ज भरला. यामुळे कॉग्रेसमध्ये पुरती खळ्बळ उडाली. या धक्यातून कॉग्रेस अद्यापही सावरलेली दिसत नाही. दरम्यान तांबेना खेचण्यासाठी भाजपाकडून पडद्यामागे काही दिवसांपासून सुरु असलेल्या हालचाली त्या खरोखर ठरल्यात. अखेरच्या क्षणी भाजपाने डाव साधत या कानाची खबर कोणालाही लागू न देता गनिमी काव्याने कॉग्रेसचा गेम करत सर्वानाच चीतपट केले. या खेळीने नाशिक पदवीधर निवड्णूक चर्चेत आली आहे.
……………….
एनवेळी झालेल्या उलथापालथमुळे नाशिक पदवीधर निवडणुकीकडे अख़्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. सुधीर तांबे यांनी पुत्रासमवेत पक्षालाच धक्का दिल्याने राज्यातील कॉग्रेस मधील वरिष्ठांची प्रचंड नाराजी आहे. त्यातूनच तांबे यांना कॉग्रेस पाठींबा देणार नसल्याचे जाहीर करुन टाकले. पदवीधर निवडणुकीसाठी जेव्हापासून नामनिर्देश भरण्यास सुरवात झाली. तेव्हापासूनच भाजपच्या हालचाली वेगळ्या दिसून येत होत्या. काॉग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे हेच उमेद्वार असल्याचे निश्‍चित होते. निवड्णूक डोळ्यासमोर ठेवूनच मागील काही दिवसांपासून तांबे हे नाशिक जिल्हयासह धुळे, नंदूरबार येथे भेटीगाठी सुरु केल्या होत्या. कॉग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेद्वारी घोषीत करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने उमेद्वार घोषीत केलेलाच नव्हता त्त्यात भर म्हणून सत्यजित तांबे यांचे ट्विट यामुळे काहीतरी अनपेक्षित होणार असल्याची कुजबूज येउ लागली होती. भाजपाने शेवटपर्यत वेट ऍड वॉचचेच धोरण अवलंबले. अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने फासे टाकलेच. आणि सुधीर तांबे यांनी कॉग्रेसकडून उमेद्वारी अर्ज न भरता आपल्याच मुलाचा अपक्ष अर्ज भरुन आले. दरम्यान काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांना भाजप गोंजरण्याचे प्रयत्न करत होते. सत्यजित तांबेची राजकीय महत्वकांक्षा पाहता वडीलांनी स्वत: थांबने पसंत केले. या सर्व घडामोडीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे स्वत: तांबे यांच्याशी संपर्कात असल्याचे आता बोलले जात आहे. सुधीर तांबेचे भूमिका यात सर्वात महत्वाची आहे. ती अशी की, जेव्हा कॉग्रेसने तांबे यांना कॉग्रसकडून उमेद्वारी घोषीत केली. त्याचवेळी आपल्याला उमेद्वारी नको, पक्षाने सत्यजित तांबे यांनी पदवीधरसाठी संधी द्यावी. हे पक्षासमोर ते मांडू शकले असते. मात्र त्यांनी असे न करता, अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाची वाट पाहीली. एबी फॉर्म त्यांच्या नावाचा होता, मात्र कोणतीही कुणकून न लागू देता एनवेळेस माघार घेतली. यासर्व घडामोडीत भाजप तांबे यांना साथ देत असल्याचे दिसून आले. यात भाजपने कोणतही उमेद्वार जाहीर केला नाही. आणि एबी फॉर्मही दिला नाही. इछूक असलेल्या राजेद्र विखेपाटील, धनंजय विसपूते, शुभांगी पाटील यांच्यासह इतर उमेद्वारांना
शेवटपर्या झुरत ठेवले. आणि या सर्व प्रक्रियेत फडवीस खेळी करण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून आखलेली व्युहरचना आणि पडद्यामागील घडामोडी बाहेर न आल्याने, यामुळेच कॉग्रेसला हक्काचा आणि पदवीधरांचा बालेकि ल्ला ज्या नाशिक पदवीधर मतदारसंघाला म्हटले जायचे, तेत्गेच सुरंग लावला. फडवीसांच्या या गनिमी काव्याने भविष्यात नगर जिल्हयातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

चौकट…
तांबेंच्या भूमिकेला थोरातांची साथ ?
कॉग्रेसचे ज्येष्ठे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सुधीर तांबे व भाचे सत्यजित तांबे यांच्या भूमिकेविषयी त्यांना खरेच माहिती नव्हते का, अशी चर्चा आता कॉगेसमध्येच सुरु झाली आहे. म्हणूनच तांबे यांनी भरलेला अपक्ष अर्ज यातील अंदर की बात थोरातांना खरच माहिती होती का, अशीही चर्चा होउ लागली आहे.
…………
भाजपाचा खेळीने विखेंना पर्याय?
नाशिक पदवीधर निवडणुकीत ज्या तर्र्‍हेने भाजपाने शेवटच्या दिवशी कॉग्रेसला चीतपट केले, त्यात फडववीसांची मोलाची भूमिका आहे. विशेष म्हणजे या घरान्याला क़ॉग्रेसची आहे, त्या कुटूंबियांना कॉग्रसपासून फारकत घेण्यास भाग पाडले. तसेच भविष्यात नगर जिल्हयातील राजकीय गणित पाहता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तांबेंच्या रुपाने पर्याय दिल्याचे बोलले जात आहे. कदाचित भविष्यात संगमनेर जेथून बाळासाहेब आठव्यांदा विधानसभेवर गेले, त्या मतदारसंघावर भाजप सत्यजित तांबे यांच्या रुपाने मैदानात उतरवू शकतो असेही राजकीय जाणकारांचे म्हणने आहे.

 

-गोरख काळे

 

Ashvini Pande

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

20 hours ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

2 days ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

4 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

4 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

4 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

5 days ago