Categories: नाशिक

निमा सरचिटणीस पदी राजेंद्र अहिरे

धनंजय बेळे यांच्याकडून निमाची कार्यकारिणी जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनची कार्यकारिणी   निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी जाहीर  केली. काल रविवार (दि.15) रोजी  पहिली  कार्यकारिणी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्षमार्फत घटनेनुसार नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
घटनेनुसार मानद सरचिटणीससाठी राजेंद्र आहिरे, उपाध्यक्ष मोठे उद्योग  गट -किशोर राठी, उपाध्यक्ष लहान उद्योग गट -आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर,  सह सचिव हर्षद ब्राह्मणकर, निमा हाऊस उपसमितिच्या अध्यक्ष पदी राजेंद्र वडनेरे, सिन्नर उपसमितीच्या चेअरमन संदीप भदाणे  व को चेअरमन सुरेंद्र मिश्रा,
दिंडोरी उपसमिती चेअरमन पदी  नितीन वागस्कर, यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा धनंजय बेळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
घटनेनुसार निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन निमाच्या सभासदांकडून करण्यात येत असून. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने तसेच उद्योजकांचे मागील २ वर्षणापासून असलेल्या प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन नवीन पदाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी सर्व नवीन नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago