नाशिक : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश महामंत्री तथा नाशिक विभागाचे संघटन सचिव विजयराव चौधरी यांनी काल शुक्रवार (दि.२)रोजी निमा कार्यालयात जात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांची भेट घेतली. या भेटीवेळी चौधरी यांनी बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची माहिती जाणून घेत झालेला प्रकार दुर्देवी असुन अशा घटना व्हायला नकोत असे मत व्यक्त केले . तसेच बेळे यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भुमिकेचे कौतूक केले.तर
उद्योग बंदचा निर्णय मागे घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी चौधरी म्हणाले, आम्ही गुन्हेगारांना कधीही पाठीशी घालणार नाही. येत्या काळात सुकाणू समिती, निमा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन झालेल्या प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करू असे सांगितले,
याप्रसंगी उपस्थित निमा पदाधिकारी व सदस्यांनी झालेल्या सर्व घटनेचा तपशील चौधरी यांना सांगितला.
नाशिक जिल्ह्याचे प्रभारी राजेंद्र गावित तसेच सहसचिव श्री भोळे, श्री बच्छाव , निखिल पवार ,प्रशांत जाधव आदी भाजपाचे पदाधिकारी व निमाचे राजेंद्र वडनेरे, विजय जोशी, कैलास पाटील, विराज गडकरी, आदींसह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.