नाशिक

बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला विहिरीत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय

मेशी : वार्ताहर
खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी पल्लवी समाधान पगार (वय 14) हिचा मृतदेह शनिवारी (दि. 9) दुपारी एकला घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला होता. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, खडकतळे (ता. देवळा) येथील पल्लवी पगार गुरुवारी (दि. 7) कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला, तसेच देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी (दि.1) दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांनी नातेवाइकांची समजूत काढली.
पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. देवळा पोलिस तपास करीत आहेत.

 

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…

48 minutes ago

काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा ठरणार यंदा शहराचे मुख्य आकर्षण

बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…

1 hour ago

मेघा आहेर ठरली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…

4 hours ago

शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे फुंकणार रणशिंग!

मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…

4 hours ago

तिसर्‍या श्रावण सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला भाविक दाखल

दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी…

4 hours ago

खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस

खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…

7 hours ago