नाशिक

शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे फुंकणार रणशिंग!

मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. शिवसेनेला (शिंदेसेना) मिळालेल्या यशानंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ताकदीने कामाला लागली आहे. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा उपनेते राहुल शेवाळे, सचिव भाऊसाहेब चौधरी आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज, सोमवारी (दि.11) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे निवडणुकीच्या द़ृष्टीने आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे उपस्थित राहतील. सकाळी दहाला बैठकीस सुरुवात होईल.

शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रव्यापी दौर्‍याच्या अनुषंगाने पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यभरातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधत आहेत. यातील पुढील टप्पा उत्तर महाराष्ट्र असणार आहे. याआधी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र विभागातील बैठका पूर्ण केल्यानंतर उद्या हॉटेल एक्स्प्रेस इन, नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकार्‍यांचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीसाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बळकटी, आगामी निवडणूक रणनीती व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
दरम्यान बैठकीला नेते, उपनेते, प्रवक्ते, आमदार, माजी आमदार, माजी खासदार, लोकसभा संपर्कप्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, संघटक, समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, आजी-

यावर होणार मंथन

प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, अंगीकृत सेल, संलग्न संघटना पदाधिकारी नियुक्ती, जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, गटप्रमुख नेमणुका व इतर संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे.

काही महिन्यांवर होणार्‍या जिल्हा परिषद,
महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षसंघटन संपूर्ण राज्यात मजबूत केले जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आज, सोमवारी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी पदाधिकार्‍यांशी संवाद साधून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा होणार आहे.
-भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना शिंदे गट

 

 

Editorial Team

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

8 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago