ऑनलाइन गेमिंगमुळे आत्महत्या केल्याची माहिती
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील भारतनगर येथील रहिवासी असलेला तरुण ओम धनवटे हा गेल्या दोन दिवसांपासून घरातून गायब होता. याबाबत सर्वत्र शोध घेण्यात आला होता तसेच मनमाड शहर पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रारदेखील दाखल होती, मात्र दोन दिवसांनंतर काल या तरुणाचा मृतदेह रेल्वेला पाणीपुरवठा करणार्या महादेव बंधार्यात आढळून आला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, ऑनलाइन गेमिंगच्या नादात त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मुलाला ऑनलाइन गेमिंग खेळण्याची सवय असल्याचे परिसरात राहणार्या त्याच्या मित्रांनी सांगितले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड शहरातील भारतनगर या भागात राहणार्या धनवटे कुटुंबातील ओम नावाचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी रात्री घरातून निघून गेला होता. त्याचा खूप शोध घेण्यात आला मात्र तो मिळून आला नव्हता. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र तो कुठेही मिळून आला नव्हता. त्याचा शोध घेता घेता काल शहरातील रेल्वेला पाणीपुरवठा करणार्या महादेव बंधार्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
यामुळे शहरात खळबळ उडाली. या मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती, असे त्याच्या परिवारातील सदस्य व त्याच्या मित्रांनी सांगितले. मात्र, याने ऑनलाइन गेमिंगमुळे आत्महत्या केली का, याबाबत काही स्पष्ट समजू शकले नसते तरी त्याने ऑनलाइन गेमिंगमुळेच आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस व मनमाड शहर पोलीस तपास
करत आहेत.
ऑनलाइन गेमिंग जीवावर बेतले
सध्या मोबाइलचा जमाना असून, या मोबाइलचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांना या मोबाइलचा आणि ऑनलाइन गेमिंगचा छंद आहे आणि यामुळे अनेक जणांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ओम यालाही ऑनलाइन गेमिंगची सवय होती. या गेमिंगमुळेच त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. जर असे असेल तर ऑनलाइन गेमिंग जीवावर बेतले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…