साफसफाई बंद झाल्याने झाडाझुडपांसह घाणीचे साम्राज्य
निफाड : तालुका प्रतिनिधी
कर्मवीरांच्या त्यागातून उभा राहिलेला, निसाका कर्जाच्या विळख्याखाली दबला गेल्याने आणि ज्यांनी ज्यांनी हा कारखाना भाडेतत्त्वावर घेतला, त्यांनीदेखील तो चालू केला नाही, तसेच जेएनपीटीने घेतलेल्या जागेत घाणीचे सम्राज्य तयार झाल्याने आजच्या परिस्थितीत कारखाना परिसरात घनदाट झाडे, काटेरी झुडपे वाढल्याने आता बिबटे, कोल्हे, लांडगे, मोर, सायाळ अजगर, विषारी सर्प यांसह हिंस्र श्वापदांचा वावर वाढल्याने परिसरात राहणार्या शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. त्यामुळे या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
निसाकाची चाके जोपर्यंत फिरत होती, तोपर्यंत परिसर दिवसरात्र गजबजलेला होता. कारखान्याच्या चारी बाजूने व्यावसायिकांनी दुकाने थाटलेली होती. बँका, पतसंस्था, कामगार पतपेढी, शाळा- महाविद्यालयांचे कर्मचारी, कारखाना कर्मचारी येथे वास्तव्यास होते. ऊसतोडणी कामगार मुलाबाळांसह परिसरात राहत होते. साहजिकच येथे नित्याची वर्दळ असायची. कारखान्याचे सुरक्षारक्षक दिवसरात्र बंदोबस्त आणि संरक्षणासाठी हजर असायचे. सफाई कामगार कारखान्यातील आणि परिसरातील स्वच्छता करायचे.
कामगार व्यावसायिकांंच्या गरजा जागेवरच सोडविल्या जायच्या. मात्र, थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेत तो प्रारंभी मुंबई येथून ओबेराय कंपनीला चालविण्यासाठी दिला. त्यांनी चालढकल करीत चार-पाच वर्षे लोटून नेली. परंतु, कारखाना चालू केला नाही. त्यानंतर जिल्हा बँकेने बी. टी. कडलग कंपनीला कारखाना भाडेपट्ट्यावर चालविण्यासाठी दिला. त्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे कारखान्याच्या जागांपैकी 108 एकर जागा जेएनपीटीला देत त्यातून येणार्या रकमेतून कारखाना सुरू करण्याचे ठरले होते.
मात्र, जिल्हा बँकेने हे सर्व पैसे घेतले आणि कारखाना चालू करण्याचे कागदावरच राहिले. परिणामी, या सर्वांच्या दुर्लक्षामुळे कारखान्यात गवत, झाडेझुडपे वाढली. यापूर्वी माणसांचा वावर असणार्या या परिसरात आता बिबटे, लांडगे, सायाळ, मोर, कोल्हे, अजगर, विषारी सर्प यांचे वास्तव्य दिसून येत असल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज कारखाना परिसरात जाण्याचे कुणी धाडस करीत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने निदान कारखान्यातील साफसफाई तरी करावी, अशी मागणी होत आहे.
कारखान्यात आणि जेएनपीटीने घेतलेल्या जागेत कुठलीही स्वच्छता होत नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात झाडे उगवली. हिंस्र श्वापद लपण्यास जागा असल्याने येथे या प्राण्यांचे वास्तव्य आहे. ही सर्व झाडे तोडण्यात यावी. परिसरात शाळा, महाविद्यालय वसतिगृह आहे. शेतकर्यांच्या जमिनी असून, ते तेथेच राहतात. परिसराची स्वच्छता व्हावी व हिंस्र श्वापदाचा बंदोबस्त करावा.
– किरण वाघ, योगेश आढाव,
सामाजिक कार्यकर्ते, भाऊसाहेबनगर
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…