आस्वाद

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री म्हणजे बैलाच्या मानेवरील ज्यू. लहानपणी आई -वडील, मोठेपणी पती, म्हातारपणी मुले या चक्राच्या बंधनात स्त्री जखडत राहते. चूल आणि मूल यातून तिला सुटका मिळत नाही. स्त्रीशिवाय घराला शोभा नाही. स्त्री ही जगात श्रेष्ठ आहे. स्त्री ही प्रसंगी मुलगी, माता, भगिनी, पत्नी, सासू, सून अशा अनेक रूपातून ती जात असते. स्त्री रूप धरतीवर अवतरताना ब्रह्मदेवालाही विचार पडला होता. ब्रह्मदेवाने स्त्रीला कुटुंबव्यवस्था सांभाळूनही अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी सहनशक्ती दिलेली आहे.
स्त्री ही जगजननी तर आहेच. परंतु ती प्रसंगी संकटावर मात करण्यासाठी दुर्गा, अंबा, सप्तशृंगी मातादेखील होते. स्त्रीशिवाय जगाचा उद्धार होऊचं शकत नाही. घरात एक दिवस कुटुंबातली स्त्री नसली तर घराची व्यवस्था डळमळीत होते. स्त्री ही कुटुंब, मुले सांभाळूनही नोकरीही करते. हे करत असताना तिला समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्थाही नीटनेटकी सांभाळावी लागते. असे असतानादेखील समाजात मुलगी जन्माला आली की नाके मुरडतात. त्यांना वंशाचा दिवा हवा असतो. आणि हेच वंशाचे दिवे म्हातारपणात आई -वडिलांना आश्रमात टाकतात.
काही मुले तर प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांना मारहाण करतात. आणि जर फायदा नसेल मिळत तर त्यांना आश्रमात सोडून देतात. तरी हे वंशाचे दिवेच का श्रेष्ठ आहेत, असा प्रश्न उभा राहतो? आज मुलांच्या अशा वागणुकीने कितीतरी नाती दुरावताना दिसतात. प्रसंगी ही मुले पैशासाठी नाती तोडतात ही समाजातील खूप केविलवाणी वाईट घटना आहे.
आज मुली सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहेत. मुलींमुळेसुद्धा कुटुंबाचे समाजाचे आणि देशाचेही नाव उंचावते. मुलींसुद्धा शिक्षणात, खेळात, प्रसारण माध्यम सर्व क्षेत्रात पुढे आहेत. शिक्षण क्षेत्रात मुलींची उभारी जास्त आहे. तरीही स्त्री ही स्वतंत्र असूनही स्वतंत्र नाही. आज आपण बघतो समाजात स्त्रियांवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात. सामाजिक हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, कुटुंबाकडून होणारे अत्याचार अशा अनेक अत्याचाराला स्त्री बळी पडते. हुंडाबळीत अनेक निरागस मुली होरपळल्या जातात. का? त्या कुटुंबातील लोकांनीही एका स्त्रीचे उदरातून जन्म घेतलाय हे सुनेला जाळताना विसरून जातात का? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
आणि माझे मन या अन्यायाविरुद्ध बंड पुकारू लागतं. तसेच सध्याच्या घटनेवर स्त्रिया शाळेतील लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार ही खूप लाजिरवाणी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. अशा घटना समाजात घडत असताना समाजातील काही लोकं गांधारीसारखी पट्टी बांधून मुकाट्याने बघतात. हे खूप लज्जास्पद आहे. का? ही सर्व मंडळीही विसरतात का? आपणही एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलाय? मग तरी अत्याचार करणारे आणि बघणारे गांधारी का? अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत. ती मुलगी, ती स्त्री पण कुणाची बहीण, मुलगी, पत्नी, सून होती. अशा अत्याचाराविरुद्ध बंड पुकारला पाहिजेत. त्यासाठी तळागाळातील समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था स्त्रियांच्या बाबतीत मजबूत झाली पाहिजे. असे घडले तर हे समाजातील स्त्री अन्याय, अत्याचार थांबतील. नाहीतर एक दिवस जनताच कायदा हातात घेईल अशी वेळ येईल. म्हणून मला समाजाला एक संदेश द्यायचा आहे की राष्ट्रगीतातील प्रत्येक शब्दाचा मान राखा आणि
स्रियांचा सन्मान करा.

Born a woman is your story

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago