पेठ येथील तलाठ्यासह तिघांवर लाचखोरीचा गुन्हा

मागितली चार लाखांची लाच

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात जमिनीच्या कामासाठी चार लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत तलाठी, एका खासगी व्यक्तीसह तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 जुलै रोजी दिलेल्या माहितीनुसार, पेठ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील या प्रकरणात तलाठी हर्षवर्धन बहिरे, तसेच खासगी इसम सुनील शिवाजी चोरडे आणि गणेश प्रकाश चोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या जमिनीच्या कामासाठी आरोपींनी सुरुवातीला चार लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी पडताळणीदरम्यान तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची चौकशी करून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील संबंधित कलमांनुसार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार माईक करीत आहेत.

 

Bribery case registered against three individuals, including the Talathi of Peth.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *