नाशिक : प्रतिनिधी
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे
-पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) मृताचे नाव आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून तडीपार होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याचा खून कोणी व का केला याचा भद्रकाली पोलीस शोध घेत आहेत.