शहर व परिसरात तथागत बुद्ध जयंती साजरी
नाशिक : प्रतिनिधी
प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचे धडे देणार्या शांती उपासक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती शहर व परिसरात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले.
पाथर्डी शिवारात भव्य धम्म महोत्सव
सिडको : विशेष प्रतिनिधी
वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, हा दिवस जगाला शांती, करुणा, अहिंसा व सत्याचा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धांची जयंती पाथर्डी शिवार येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरातील बुद्ध स्मारक येथे शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता धम्मध्वजारोहण, बुद्धपूजा पाठ व बोधिवृक्ष वंदनेने झाली. या वेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भदंत यु. नागधम्मो महाथेरो, भदंत सुगत शांतेय, भदन्त उपालि, भदंत मेक्तानंद, महानाम तसेच नगरसेवक भगवान दोंदे, दीक्षा लोंढे व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.या दिवशी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व भिक्खू संघास भोजनदान याचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.दुपारी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (शालिमार) येथून सुरु झालेली भव्य धम्म रॅली एमजी रोड, जुने सीबीएस, त्र्यंबक नाका, सातपूर राजवाडा, स्वरबाबा नगर, त्रिमूर्ती चौक, उपेंद्र नगर, पाथर्डी फाटा मार्गे बुद्ध स्मारक येथे संपन्न झाली. या रॅलीत मोठ्या संख्येने भिक्खू व अनुयायांनी सहभाग घेतला.संध्याकाळी संतोष जोंधळे यांच्या आवाजातील बुद्ध-भीम गीतांचे प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
गंजमाळ येथे खीरदान
सिडको: बुद्ध पौर्णिमेनिमित्त शिवसेना प्रणित गुणरत्न आरोग्य फाउंडेशन व सिद्धार्थ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंजमाळ येथे भव्य खीरदान व अन्नवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी गुणरत्न आरोग्य फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक डोके, मनसेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पगारे, बीजेपीचे गणेश मोरे, कोमल कुशनचे संचालक सागर सोनवणे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत सेवा बजावली.कार्यक्रमाची उपस्थित व मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. असे उपक्रम नियमितपणे राबवावेत अशी भावना व्यक्त करण्यात
त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी बुद्धवंदना
सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाटा, त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संघमित्रा बुध्द विहारात, संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुध्द जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ध्यानसाधना, पंचशील ध्वजारोहण, अष्टशील ग्रहण, धम्मदेसना, संघदान, खीरदान, भन्तेजींचे भोजनदान, व्याख्यान असे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. ‘मानव निर्मीत समस्या व बौध धम्म’ या विषयावर आयु. बि. के. थोरात सर यांनी मार्गदर्शन केले, तर ‘त्रिविध पौर्णिमेचे महत्व’ या विषयावर प्राचार्या आयु. विशाखरुद्ध कसबे यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपासक,उपासिका सहभागी झाले होते. पांढर्या शुभ्र वस्त्रधारण करून उपस्थिती लावलेल्या सर्वांनी तथागत बुद्धांना वंदन करण्यात आले यावेळीअनिल गायकवाड, सुखदेव दोंदे, देविदास जगताप, देविदास गायकवाड, नटवर भालेराव, एम. टी. जाधव, पदम पानपाटील, अर्जुन बिर्हाडे, प्रकाश पगारे, भाऊसाहेब साळवे, सुभाष बोरकर, मिलिंद बनसोडे, सागर रामटेके, संकेत गायकवाड, संदीप दोंदे, विशाल दोंदे, लखन भुजबळ, राहुल भालेराव, आकाश साळवे, अनिल दोंदे, कुणाल डोंगरदिवे, नरेश गायकवाड, सदाशिव गायकवाड, संजय गायकवाड, रोहिदास पगारे. ज्योती अनिल गायकवाड, ज्योती देविदास गायकवाड, शितल जगताप, ईशा भालेराव, संघमित्रा पानपाटील, जयश्री जाधव, राखी जाधव, उज्ज्वला मोरे, तेजस्विनी मनवतकार, लक्ष्मी साळवे, राधा चव्हाण, सुप्रिया बनसोडे, सुरेखा पगारे, शुभांगी गायकवाड, सुनंदा गायकवाड, सानिया गायकवाड, माया हनवते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणवेली काढण्याचे काम अंतिम टप्प्यात निफाड : प्रतिनिधी तालुक्यातून वाहणार्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी…
गुन्हे शाखा युनिट-2 ची उल्लेखनीय कामगिरी सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांपासून विनयभंगाच्या गुन्ह्यात…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा पेठ व इतर ठिकाणी अवकाळी पावसाने सलग दोन ते…
नागपूर : मुलीकडून तिच्या वडिलांनी घेतलेल्या उधारीचे पैसे परत करण्याच्या वादातून जावयाने झोपेत सासर्याच्या डोक्यावर…
शहापूर : प्रतिनिधी विवाह करण्यासाठी कल्याणमधील एक तरुण मनपसंत तरुणीच्या शोधात होता. ऑनलाइन वधू-वर सूचक…
सिडको : विशेष प्रतिनिधी शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त…