सिडको : विशेष प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील लामखेडे मळा येथील सृष्टी पार्कमधील एका निवासी फ्लॅटमध्ये घरफोडी करत चोरट्यांनी दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अशोककुमार विठ्ठलराव दोंदे (वय 57), व्यवसायाने रिअल इस्टेट एजंट, रा. सृष्टी पार्क, दुसरा मजला, प्लॉट क्र. 07, लामखेडे मळा, तारवाला नगर, पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 8 जूनला सकाळी साडेअकरापासून ते दि. 10 जूनच्या रात्री साडेबारादरम्यान चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या मुख्य
दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटातून सुमारे दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ
पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार भोये करत आहेत.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…