फरार घरफोडीचा आरोपी अखेर गजाआड

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाणे हद्दीत 2020 मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे. अली हुसेन नुरअली शेख (वय 37, रा. संजीवनगर, अंबड लिंक रोड, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाहिजे व फरार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पवननगरमधील मार्केट परिसरात असल्याचे समजताच प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलिस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस पकडले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.अली शेख याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील चौकशीसाठी त्याला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार यांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कौतुक होत आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago