खेडलेझुंगे येथे गायीच्या गोठ्याला आग लागल्याने पशुधन होरपळले

खेडलेझुंगे येथे गायीच्या गोठ्याला आग लागल्याने पशुधन होरपळले

लासलगाव :  प्रतिनिधी

अस्मानी सुलतानी संकटामधून वाटचालीस करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका संपता संपेना.उन्हाळ्यामध्ये जनवारांना चारा मिळावा म्हणून सोयाबीन, मका चऱ्याची कुटी (भुसा) साठवून ठेवलेला होता. त्याला मध्यरात्री आग लागल्याने सर्व नष्ट होऊन चाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील कैलास माधव घोटेकर यांच्या मालकीच्या गट नंबर ४५२-अ मध्ये राहते घर आणि जनवारांचा गोठा आहे. त्यांनी पशुधणासाठी साठवून ठेवलेल्या भुश्याच्या छपराला व गायीच्या गोठ्याला मध्यरात्रीच्या २-३ वाजेच्या सुमारास आग लागून अंदाजे सुमारे २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

रात्री अंदाजे २-३ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमध्ये राहात्या घरासमोरील गोठ्यात १ गाय ५ म्हशी आणि १ पारडी आगीच्या वाफेने मोठ्या प्रमाणावर भाजल्या आहेत. भर वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले घोटेकर कुटुंबियांच्या जनावरांच्या गोठ्याला आणि भुसाऱ्याच्या ढिगाला मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. घरासमोर यांचा जनावरांचा गोठा होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने गाढ झोपेत असलेले कुटुंबीय यांच्या आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. आगीच्या वाफेमुळे जनवारांनी मोठ्याप्रमाणावर आरडाओरडा सुरु केला होता. या आवाजाने घोटेकर व परीसरातील कुटुंबीय जागे होऊन गोठ्याकडे धावले असता गोठ्यातून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे विदारक चित्र बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु ओरडणारे पशुधन डोळ्यासमोर बघून सर्वांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. भुसाऱ्याची आग असल्याने आग विझविण्यासाठी मोठा कालावधी गेला. आगीमध्ये मोठी ६ आणि १ लहान अशा ७ जनावरे ३०-४०% भाजली असून गोठ्याचे पत्रे, अँगल, आणि शेतीसाठीचे पिव्हीसी पाईप जळून खाक झाली आहेत अशी माहिती कैलास माधव घोटेकर यांनी दिली.

आगीमध्ये जनावरे भाजल्याची माहिती मिळताच देवगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.एम.जी शीसोदे व त्यांचे सहकारी टीम भाजलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी तात्काळ हजर झाले. १ गाय आणि ५ म्हशी आणि १ पारडी (छोटे म्हशीचे पिलू) यांची तपासणी करून ते ३०-४० % भाजल्याचे डॉ. शिसोदे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचेवर वेदना शामक प्रति जैविके व्हिटॅमिन्स चे इंजेक्शन आणि सलाईन देऊन जखमेवर शाई व मलम लावून उपचार केले.
शासन स्तरावरून पंचनामा होऊन मदत मिळावी अशी परिसरसतील शेतकरी वर्गकडून मागणी होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ज्ञानेश्वर गिते, प्रमोद गिते, साईल घोटेकर, कैलास साबळे, सावळीराम गिते, विलास घोटेकर, ऋषिकेश घोटेकर, कृष्णा घोटेकर, अनिमेश साबळे, सार्थक साबळे, गणेश गितेयांनी अथक परिश्रम घेतले.

—————————————

शेतीमालाला भाव नाही म्हणून मी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी म्हशी व गाय घेतली होती. परंतु मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे जाणवरांचे मोठे नुकसान झाले आहे. लागलेल्या आगीमध्ये ६ मोठी आणि १ लहान अशा ७ जनवारांचे भाजून मोठे नुकसान झालेले आहे. तसेच गोठ्याचे पत्रे, पाईप, अँगल चे नुकसान झालेले आहे. शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे.

कैलास माधव घोटेकर, शेतकरी.

पशुधन मोठ्या प्रमाणावर आगीच्या वाफेमुळे भाजली आहेत. ती पूर्ण बरी होण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. जखमा खोलवर नसल्याने पशुधन दगवण्याची शक्यता खूपच कमी आहे.

– डॉ. एम. जी. शिसोदे, पशुधन विकास अधिकारी, देवगाव

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

8 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago