नाशिक वाडीवऱ्हे बसमधुन विद्यार्थी करताय जीवघेणा प्रवास
नाशिक : वार्ताहर
चार दिवसांपुर्वीच औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ घडलेली बस दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच जुन्या सीबीएस मधुन वाडीवऱ्हेकडे जाणाऱ्या बससंबंधी एक भयावह असा चीड आणणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
जुन्या सीबीएस येथुन दररोज दुपारी 3 च्या सुमारास नाशिककडून वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी बस सुटते. काल दुपारी या पंचवटी डेपोच्या बस (क्रमांक एमएच 14 बीटी 4509) मध्ये सुमारे दीडशे शालेय विद्यार्थी कोंबुन भरलेले दिसुन आले. शाळा, कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाण्यासाठी सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमध्ये मुठीत जीव घेऊन जीवघेणा प्रवास दररोज करतात. या विद्यार्थ्यांच्या जीवाला हानी पोहोचल्यास अथवा बससोबत काही अघटीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या 8 दिवसांत जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी बसेसला आगी लागल्याच्या घटना घडल्या. औरंगाबादरोडवरील मिर्ची हॉटेलजवळ बसचा अपघात ताजा असतांनाच काल पुण्याजवळ बसला आग लागली यात सुमारे 27 प्रवाशी बालंबाल बचावले. या घटना ताज्या असतांनाच, बसमध्ये सीटची संख्या 55 असतांनाच अशाप्रकारे सुमारे 150 विद्यार्थ्यांना कोंबणे कितपत व्यवहार्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.
यासंबंधी आमच्या वार्ताहरांनी अधिक तपास केला असता समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नाशिक वाडीवऱ्हेसाठी वाडीवऱ्हे डेपोतुन दर तासाला नाशिककडे बस सुटते. दिवसभरात अशा सुमारे 12 तासात 12 बसेस सुटतात. मात्र त्या केवळ कागदोपत्रीच. यासंबंधी तथ्ये तपासली असता साधारण: अडीच ते तीन तासांनी वाडीवऱ्हे येथुन नाशिकला 1 बस येते अशी माहिती समोर आली.
वाडीवऱ्हे येथुन सकाळी सुटलेली बस बारा ते साडेबारा दरम्यान नाशिकला पोहोचते त्यानंतर अडीच ते तीनच्या सुमारास दुसरी बस नाशिकला पोहोचते. सकाळच्या सत्रातील शाळा, कॉलेज करुन घरी जाण्यासाठी सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सीबीएस बस स्टॅण्डवर ताटकळत उभे असतात. अडीच ते तीनच्य सुमारास वाडीवऱ्हे येथे जाण्यासाठी केवळ एकच बस सुटत असल्याने याच बसमध्ये सुमारे 150 विद्यार्थी अतिशय दाटीवाटीने शेळ्यामेंढऱ्यांप्रमाणे कोंबुन या बसमधुन प्रवास करतात.
यासंबंधी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे अतिशय धोकादायक आहे. एखादा अपघात घडून कुणाचा जीव गेल्यावरच महामंडळाला जाग येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांसह प्रवाशी विचारत आहे.
वाडीवऱ्हे आगारातून नाशिकसाठी दर तासाला एक बस सुटते मात्र ती कागदोपत्रीच. प्रत्यक्षात दर तीन तासाला एक बस नाशिकला पोहोचते. या समस्येचे मुळ कारण बसच्या संख्येत आहे. वाडीवऱ्हे आगाराकडे असलेल्या बसची संख्या प्रत्यक्षात कमी आहे. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी वेळप्रसंगी नाशिक आगारवाले पंचवटी डेपोच्या बसेस वाडीवऱ्हेला जाण्यासाठी उपलब्ध करुन देतात. केवळ एक बस असल्याने विद्यार्थी घरी जाण्यासाठी याच बसमध्ये गर्दी करतात. त्यामुळे सुमारे 150 विद्यार्थी एकाच बसमधुन प्रवास करतात. दुर्देवाने काही अघटीत घडल्यास कुणाला दोष देणार असा संतापजनक सवाल प्रवाशी विचारत आहेत.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…