नाशिक:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयामार्फत मातंग समाज व त्यातील 12 पोट जातीतील 60 टक्के व त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याअनुषंगाने पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 22 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, या योजनेंतर्गत 2021-22 वर्षामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी, पदवी व वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 60 टक्के व त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुणवत्तेनुसार (मेरीटप्रमाणे) व उपलब्ध निधीनुसार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथिल जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी कळविले आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…