महाराष्ट्र

रामसेतू तोडण्याऐवजी दुरुस्ती करावी

कल्पना पांडे: प्रसंगी आंदोलनाचाही इशारा
नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत ऐतिहासिक रामसेतू पूल तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण असून, हा पूल तोडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राम सेतू बचाव अभियानाच्या कल्पना पांडे यांनी दिला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.
रामसेतूमुळे नाशिक शहरातून पंचवटीत जाणे सोयीचे ठरते. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूचा सहारा घ्यावा लागतो. रामसेतू जर तोडला तर नाशिक व पंचवटीतील नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरणार आहे. रामसेतू तोडण्याऐवजी गंगापूर धरणातील गाळ काढावा, गोदावरीचे कॉंक्रिटीकरण काढावे त्यामुळे नदीपात्र खोल होईल आणि नदीपात्रातील नैसर्गिक स्त्रोत खाली जाईल, पाणी जिरण्याचे प्रमाण वाढेल. रामसेतूजवळ असलेले स्मारके, गांधी स्मारक, कपूरथळा, पुरातन मंदिरे व वास्तू आजही महापुराचे दणके सहन करुनही दमदारपणे उभ्या आहेत. रामसेतू पुलाचे मजबुतीकरण व डागडुजी केल्यास तो ही ताठपणे उभा राहिल. ब्रिटिशांनी होळकर पुलाची गॅरंटी संपलेली आहे. असे घोषित केल्यावरही त्या पुलाला नाशिक मनपाने मजबुती व डागडुजी व सुशोभित केले आहे. त्यास आजपर्यंत काही झालेले नाही. नाशिक मनपा व स्मार्ट सिटीच्या वतीने रामसेतू पुलाची पाहणी करण्यात आली. पुलावरील दोन टप्याचा थर व छोटे होल व खड्डे भरुन व पुलाची डागडुजी करता येणे शक्य आहे. परंतु एवढा वेळ त्यांच्याजवळ वेळ असूनही नवीन स्लॅब टाकू शकले असते. तरी पण रामसेतू पुलावर सदरचे काम अधिकार्‍यांनी केलेले नाही. पुलाचा वापर बंद करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी करीत आहेत.
गोदाघाट, रामसेतू पूल हा अगोदरपासूनच असल्याने त्याचे चांगल्याप्रकारे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. फक्त जिथे गरज आहे. तेथे स्लॅब टाकून रामसेतू पूल मजबुत होणार आहे. आहे त्या स्थितीत रामसेतूचे मजबुतीकरण करावे, सुशोभीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेला सुनील महंकाले, सतीश शुक्ल, रमेश निकम, राजेंद्र अदयप्रभू, संजय प्रयागे उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago