नाशिक

नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम

सिन्नर पोलिसांची दोन विशेष पथके मैदानात; विक्रेते व वापरकर्त्यांवर कडक कारवाई

सिन्नर : प्रतिनिधी
पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध नायलॉन मांजामुळे होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी सिन्नर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, तसेच मुक्या पक्ष्यांना जीवघेण्या दुखापती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शहरात दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.
पहिले पथक उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यात पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, गणेश वराडे, कृष्ण कोकाटे व प्रशांत सहाणे यांचा समावेश आहे.
दुसरे पथक उपनिरीक्षक दादा गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असून, पोलीस हवालदार हरीश आव्हाड, भारत पवार, रवींद्र चिने व प्रमोद साळवे या पथकात आहेत.
या पथकांनी सिन्नर शहरातील वावीवेस, शिवाजीनगर, सरदवाडी रोड, देवी रोड, बाजारपेठ आदी भागांमध्ये पतंग विक्रेत्यांची दुकाने तपासण्यास सुरुवात केली आहे. तपासणीदरम्यान अवैध नायलॉन मांजा साठवणूक, विक्री अथवा वाहतूक करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणार्‍या व्यक्तींवरही कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नायलॉन मांजाच्या बाबतीत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कागदी अथवा सुती मांजाच वापरावा, तसेच अवैध नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर कुठे आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सिन्नर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशीही राहणार वॉच

विशेष म्हणजे, नायलॉन मांजाचा वापर करणारा अल्पवयीन आढळल्यास संबंधित पालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरातील गल्लोगल्ली, वसाहती, छतांवर, तसेच मोकळ्या मैदानात पोलिसांची कडक नजर राहणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीसुद्धा विशेष पथके तैनात राहून कारवाई करण्यात येणार आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago